रक्तात हिवताप जंतू आहेत की नाही याची सत्वर तपासणी करण्यासाठी आता किट उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात 2007-08 साली पूर्वीपेक्षा हिवतापाचे प्रमाण थोडे जास्त होते याचे कारण या वर्षी झालेला जादा पाऊस असू शकतो. या वर्षी महाराष्ट्रात एकूण 68 हजार हिवताप रुग्ण नोंदले गेले. यापैकी फाल्सिपेरम हे घातक जंतूप्रकार असलेले सुमारे 22000 रुग्ण होते.
राज्यामध्ये 2005-06 साली सुमारे दीड कोटी रक्त नमुने घेण्यात आले, आणि तपासले गेले. यातून सुमारे 45 हजारावर नमुन्यांमध्ये हिवतापाचे जंतू आढळले. यापैकी तिसरा हिस्सा फाल्सिपेरम प्रकारचा म्हणजे घातक जंतूंचा होता. हिवतापाच्या आजाराच्या बाबतीत मुलांमध्ये पांथरी सूज असणे ही एक महत्त्वाची खूण आहे. यातील जवळजवळ सर्व रुग्णांना समूळ उपचार करण्यात आले. त्यावर्षी महाराष्ट्रात मुलांमध्ये पांथरी सूजेचे प्रमाण हजारी 3इतके होते.
महाराष्ट्रात हत्तीरोगाची लागण पूर्वीपासूनच आहे. हत्तीरोग सर्वेक्षणात सुमारे साडेदहा लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे 5000 व्यक्तींच्या रक्तात हत्तीरोगाचे सूक्ष्म जंत सापडले तर एकूण 655 व्यक्तींना हत्तीरोगाची सूज आढळून आली.
डेंग्यूची साथ दर वर्षाआड कमी जास्त प्रमाणात आढळते. महाराष्ट्रात 2001 पासून डेंग्यूची लागण दरवर्षी होत आहे. 2005-06 साली सुमारे 21 हजार रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली यामुळे 56 रुग्ण मरण पावले. या रुग्णांपैकी सुमारे दीड हजार व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आणि यातील सुमारे 400 बाधित आढळले. 2007-08 साली एकूण लागण कमी असली (4200) तरी त्यामुळे 25 बळी गेले आणि 1400 रक्त नमुन्यांपैकी 620 बाधित आढळले. याचाच अर्थ डेंग्यूचा रोग हा महाराष्ट्रात दरवर्षी गृहीत धरायला पाहिजे.
जपानी मेंदूज्वर हा क्युलेक्स डासांमुळे पसरणारा घातक आजार आहे. 2003-04 साली यामुळे सुमारे 475 व्यक्तींना लागण झाली आणि यातील 115 जण मृत्यू पावले. या सर्व रुग्णांचे रक्त नमुने तपासले होते. त्यापैकी 23 जणांच्या रक्तामध्ये डेंग्यूचे विषाणू आढळले.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...