हिवतापावर उपचार करताना दोन उद्देश असतात. (अ) थंडीताप, इत्यादी त्रास थांबवणे, (ब) रक्तातील नर-मादी रुपातल्या जंतूंचा समूळ नाश (रोगप्रसार होऊ नये म्हणून) व यकृतातील जंतूंचा नाश.
कोणत्याही हिवतापांवर सुरुवातीस क्लोरोक्वीन हे औषध द्यावे. याचा प्राथमिक डोस तीन दिवसांचा आहे. या गोळयांमुळे जठराचा दाह होतो. म्हणून या गोळया जेवणानंतर लगेच घेणे आवश्यक असते.
गरोदरपणात या गोळया घ्याव्यात की नाहीत यावर दुमत होते. गर्भावर या औषधाचा दुष्परिणाम होऊ शकतो. पण हिवतापामुळे गर्भपात होणे किंवा गर्भाची वाढ खुंटणे याची शक्यता असते. म्हणून हिवतापावर गरोदरपणातही उपचार केलेच पाहिजेत.
क्लोरोक्वीनसंबंधी जास्त माहिती औषधांच्या प्रकरणात दिली आहे.समूळ उपचारासाठी वयानुसार तक्ता - टेबल
(फॉल्सिपेरम प्रकारात प्रिमाक्वीन गोळी 7.5 मि.ग्रॅ. ची असते. बाकी सर्व तपशील सारखाच)
समूळ उपचारासाठी प्रिमाक्वीन आवश्यक असते. ते आरोग्यपर्यवेक्षक किंवा प्राथमिक आरोग्यकेंद्र यांच्यामार्फत मिळते. प्रिमाक्वीन या नावाने औषधविक्रेत्यांकडेही मिळते.
कधीकधी हिवतापाच्या प्रदेशात याची गरज पडते. यासाठी क्लोराक्वीनचा एक डोस आठवडाभर पुरतो. डोस वरीलप्रमाणेच.
हिवतापावर इतर अनेक औषधे दिली जातात. मात्र याचा निर्णय डॉक्टरांनीच घ्यावा.
महासुदर्शन चूर्ण इतर तापांप्रमाणे मलेरियातही उपयोगी पडते. मोठया माणसांना एक ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळा (म्हणजे तीन ग्रॅम), कोमट पाण्याबरोबर द्यावे. याप्रमाणे रोज हा उपचार आठ दिवस करावा. काडेचिराईत हिवतापासाठी उपयुक्त आहे. यापासून चिराकिन ही गोळी केंद्र सरकारने उपलब्ध केली आहे.
आर्सेनिकम, बेलाडोना, फेरम मेट, लायकोपोडियम, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/18/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...