कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
१. स्मृतीभ्रंश
अलीकडेच वाचलेले लक्षात न राहणे हे डेमेन्शियाचे अगदी सामान्य लक्षण आहे. व्यक्ति विसरायला लागते व मग मागील काहीच आठवणे अवघड होऊ लागते.
२. घरगुती कामे देखील अवघड वाटणे
डेमेन्शिया असणा-यांना काही ठरवणे अवघड वाटते किंवा दिवसभराची कामेदेखील अवघड वाटतात. घरकामातील स्वयंपाक कसा करावा या देखील गोष्टी फार अवघड वाटू लागतात, फोनवर बोलणे अवघड वाटते आणि कुठलाही खेळ खेळणे अवघड वाटू लागते.
३. भाषेत चुका
अल्झायमर असलेल्याना अगदी सोपे शब्द किंवा त्याचे पर्यायदेखील आठवत नाहीत, त्यांचे भाषण तयार करता येत नाही व काही लिहायला, समजायला अवघड जाते. त्यांना कधीकधी आपला तोंडधुण्याच्या ब्रशला काय म्हणतात हे आठवत नाही व ते माझे तोंड धुण्याचे ते काय कुठे आहे असे विचारु लागतात.
४. जागा व वेळेचे भान न राहणे
अल्झायमर असणा-यांना त्यांच्या स्वतःच्या शेजारच्या घरातदेखील हरवल्यासारखे होते, ते कुठे आहेत हे विसरतात आणि ते इकडे कसे आले आणि आता परत कसे जायचे ते विसरतात.
५. तर्कज्ञान बिघडते
अल्झायमर असणा-यांचे कपडे घालणे बिघडते, गरमीत ते कपड्यांवर कपडे घालतील आणि थंडीत फार कमी कपडे घालतील. त्यांचे तर्क ज्ञान चुकते, जसे ते कोणा अनोळख्याला मोठी रक्कम देतात.
६. संक्षिप्त विचारांमध्ये गडबड
ज्यांना अल्झायमर आहे ते मेंदुची कामे करताना गडबड करतात, जसे आकडे विसरणे व ते कसे वापरायचे ते न आठवणे.
७. वस्तू जागच्या जागी न ठेवणे
अल्झायमर असलेल्या व्यक्ति त्यांच्या वस्तू कुठेतरी ठेवतात व त्या नंतर शोधत राहतात किंवा इस्त्री फ्रीज मध्ये ठेवतात.
८. त्यांचा स्वभाव लहरी बनतो
काही अल्झायमर असलेल्या व्यक्ति अचानक स्वभाव बदलतात – जसे रागावतील मग हसतील मग रडतील – काही कारण नसतांना.
९. वागण्या बोलण्यात फरक डेमेन्शिया असलेल्यांच्या वागण्यात नाटकीय बदल आढळतो. ते एकदम संशयी, तर कधी चुकलेले, तर कधी घाबरट कधी घरातील इतरांवर अवलंबुन असे दिसतात.
१०. पुढाकार घेत नाहीत
अल्झायमर झालेली व्यक्ति एकलकोंडी बनते, ते टीव्ही समोर तासनतास बसुन राहतात, झोप काढत राहतात किंवा रोजची कामेदेखील व्यवस्थित करत नाहीत.
जर तुम्हाला यातील कोणतीही धोक्याची चिन्हे तुमच्यात किंवा तुमच्या प्रियजनांत दिसली तर, वैद्यकिय सल्ला घ्या व शोधा की तो अल्झायमर किंवा डिमेंशिया होण्याची चिन्ह तर नाहीत व योग्य उपचार घ्या, काळजी घ्या आणि सल्ला घ्या.
मुळ:
शैलेश मिश्रा – संस्थापक अध्यक्ष, सिल्व्हर इनिंग फाऊंडेशन
Email : sailesh2000_2000@yahoo.co.uk ; Website: www.silverinnings.com
Blog: http://peopleforsocialcause.blogspot.com/
आपणे जसे वृध्द होत जातो, तशी आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता मंदावते. परंतु, स्मृतीचे गंभीर नुकसान, संभ्रम आणि इतर मुख्य बदलांनी आपले मन ज्याप्रकारे काम करते ते बदलते आणि हा काही वृध्दत्वाचा सामान्य भाग नाही. मेंदूच्या पेशी निकामी होत असल्याचे ते एक चिन्ह असते.
मेंदूमधे 100 अब्ज चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. प्रत्येक चेतापेशी इतर अनेक पेशींसोबत संवाद साधून जाळी बनवतात. चेतापेशींच्या या जाळ्यांची विशेष कार्य असतात. त्यापैकी काही विचारात, शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात गुंतलेली असतात. इतर आपल्याला पाहण्यास, ऐकण्यास आणि गंध घेण्यास मदत करतात. आणखी इतर आपल्या स्नायूंना हालचाल करण्यास सांगतात.
हे काम करण्यासाठी, मेंदूच्या पेशी लहान कारखान्यांप्रमाणे कार्य करतात. ते पुरवठा घेतात, ऊर्जा निर्माण करतात, यंत्रसामुग्री बांधतात आणि कच-याची विल्हेवाट लावतात. पेशी या माहिती साठवतात आणि त्यावर प्रक्रियादेखील करतात. सगळंकाही चालू ठेवण्यासाठी समन्वय लागतो तसंच मोठ्या प्रमाणात इंधन आणि ऑक्सीजन लागतो.
अलझायमर्स रोगात, पेशींच्या कारखान्यांचे भाग नीट काम करत नाहीत, त्यामुळे इतर कार्ये प्रभावित होतात. नुकसान जसजसे वाढत जाते तसे, पेशी या आपले कार्य नीट करण्याची क्षमता हरवून बसतात. अंततः त्या मरतात.
थर आणि टँगल्स हे दोन असामान्य घटक चेतापेशींना नुकसान पोचवून त्यांना मारुन टाकण्यात मुख्य संशयित आहेत.
थर हा चेतापेशींच्या मधे जमा होतो आणि टँगल्स हे पीळ पडलेले तंतु असतात जे मरणा-या पेशींच्या आत तयार होतात. बहुतांश लोकांना ते वृध्द होतात तसे हे थर आणि टँगल्स तयार होतात तरीही अलझायमर्स असलेल्यांना ते अधिक संख्येने होतात. थर आणि टँगल्स हे शिक्षण आणि स्मृतीसाठी महत्वाच्या भागांमधे तयार व्हायला लागतात आणि नंतर अन्य भागांमधे पसरतात.
प्रारंभिक टप्पा आणि लवकर प्रारंभ
प्रारंभिक टप्पा हा अलझायमर्सच्या सुरुवातीचा भाग असतो जेव्हा स्मृती, विचार आणि एकाग्रता यांची समस्या दिसू लागते. लवकर येणे याचा अर्थ हा रोग एखाद्या व्यक्तीला वयाच्या 65 वर्षाच्या आधी येतो.
यावर सध्या उपचार उपलब्ध नाही. परंतु लक्षणांसाठी उपचार आणि त्यासोबत, योग्य सेवा आणि आधार मिळाला तर अलझायमर्स असणा-या लोकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 4/29/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...