मेंदूजल मेंदू व मज्जारज्जूभोवतीच्या विशिष्ट पोकळयांत एक द्रवपदार्थ (मेंदूजल) भरलेला असतो. या द्रवपदार्थात काही क्षार, साखर,प्राणवायू, इत्यादी पोषक पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. मेंदू व मज्जारज्जूच्या आतील भागांना या पदार्थाचा पुरवठा होण्यासाठी या द्रवाचा उपयोग असतो. आजूबाजूचे रक्तवाहिन्यांचे जाळे व हे मेंदूजल यांमध्ये पदार्थाची सतत देवाणघेवाण चालू असते. मेंदूचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही व्यवस्था आवश्यक असते. काही आजारांत पाठीच्या कण्यातून तपासणीसाठी पाणी काढून घेतात ते हेच मेंदूजल असते. मेंदूजलविकार काही जन्मजात दोषांमुळे मेंदूजलाचे प्रमाण व त्याचा दाब वाढतो. अशा बाळाचे डोके मोठे दिसते. टाळूही मोठी व फुगलेली आढळते. जन्मलेल्या काही बाळांमध्ये पाठीच्या कण्यावर कोठेही पातळ त्वचा असलेला (किंवा त्वचा नसलेला) फुगा दिसतो. हा देखील मेंदूजलाचा फुगा असतो. सौम्य प्रमाणात असतील तर हे दोन्ही विकार शस्त्रक्रियेने बरे होण्यासारखे असतात. आता सोनोग्राफी तंत्राने या दोन्ही विकारांचे गर्भावस्थेतच निदानही करता येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...
शरीरातील स्नायू ताठ होऊन त्यांचे प्रचंड, अनियंत्रि...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्...