उपचाराच्या काळात 8 ते15 दिवस पाय कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे.
यासाठी विश्रांती घ्यावी किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे. तोंडाने कोझाल व ऍस्पिरिनच्या गोळया द्याव्यात. जखमा असतील तर जंतुनाशक मलम किंवा लिंबाच्या पाल्याचा रस लावल्याने चिखल्या ब-या होतात.
प्रतिबंधक उपाय म्हणून 'गमबूट' म्हणजे उंच पायाचे बूट वापरणे चांगले; पण अनेकांच्या दृष्टीने हा उपाय खर्चीक वाटेल.
चिखल्या हा शब्द आणखी एक वेगळया आजारासाठी वापरला जातो. पायाच्या बेचक्यांमध्ये पांढरट स्राव सुटणारा बुरशीदोष होतो. हाही ओलेपणामुळे होतो. जेंशन व्हायोलेट लावल्याने ही तक्रार दूर होते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 8/17/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...