पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया हवामानात सर्रास आढळणारे दुखणे आहे. अनवाणी किंवा नुसत्या चपला घालून वावरल्याने पायावर घर्षणाचा,कोरडया वातावरणाचा व धुळीचा परिणाम होऊन भेगा पडू शकतात. बुटांच्या सतत वापराने भेगांचे प्रमाण आपोआप कमी होते.
भेगा पडल्यावर तात्पुरता आराम म्हणून रोज रात्री पाय गरम पाण्यात5 मिनिटे बुडवून ठेवावेत. यानंतर स्वच्छ धुऊन खोबरेल तेल किंवा आमसूल तेल लावावे. भेगा होऊ नयेत म्हणून बूट वापरावेत. बुटांनी पायाचा कोरडेपणा कमी होतो व त्वचा चांगली राहते.
(अ) राळेचे मलम (तेल, पाणी, व राळ यापासून करतात. हे मलम रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर लावल्यास आराम पडतो.)
(ब) गाईम्हशींच्या प्रसूतीमध्ये पडलेली वार चरबीयुक्त असते. ही चरबी जळवातात उपयोगी पडते. यासाठी जळवातावर वार दोन-तीन तास बांधून ठेवणे किंवा निदान वार काही वेळ पायाखाली घ्यावी. या उपायाने निदान दोन-तीन महिने तरी जळवाताची वेदना होत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
बुबुळाचा दाह होऊन जखमझाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष य...
बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा...
गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्र...
आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था ...