त्वचेची रचना दोन थरांमध्ये असते. यांतला वरचा किंवा बाहेरचा थर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच उपथरांनी बनलेला असतो. या पाच पेशीथरांपैकी सर्वात खालच्या पेशीथरापासून सतत निर्माण होत असतात. खालचे थरहळूहळू वर सरकतात. सर्वात बाहेरचा पेशीथर सतत झिजेमुळे टाकला जातो व नवा खालून भरून येतो. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा चेतातंतू नसतात. पोषण किंवा संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या थरावर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेवर जखम झाली तर खालच्या पेशीथरांमुळेच जखम भरून येते.
या बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. या मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री-पुरुषभेद, वय, इत्यादी विविध गोष्टींवर अवलंबून असते. या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्वचेचा रंग आणखी दोन रंगद्रव्यांमुळे येतो. (अ) त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य-कॅरोटिन आणि (ब) त्वचेच्या रक्तप्रवाहातील रक्तद्रव्य-हिमोग्लोबीन ही ती दोन रंगद्रव्ये आहेत.
त्वचेचा दुसरा थर जोडपेशी आणि सूक्ष्म तंतूमय भाग यांनी बनलेला असतो. यात रक्तप्रवाहासाठी केशवाहिन्यांचे जाळे,संवेदनांसाठी चेतातंतू (वेदना,शीतोष्ण, दाब, ताण, स्पर्श)घामग्रंथी आणि केशमुळे असतात.
त्वचेतील ग्रंथीतून तेलकट पदार्थ पाझरतो. हा पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. साबणाच्या वापराने हा तेलकट थर निघून जातो. यामुळे त्वचा खरखरीत बनते. आरोग्यासाठी साबणाचा वापर आवश्यक नाही,उलट तो हानिकारक ठरू शकतो. अगदी तेलाशीच रोज काम असेल किंवा अंग फारच मळकट झाले असेल तर साबण वापरणे गरजेचे आहे. इथेही साबणाच्या ऐवजी बेसन, शिकेकाई, रिठे,इत्यादी पदार्थ वापरता येतात. (साबणाचा वापर वाढत चालल्याने जलप्रदूषण वाढत आहे हे लक्षात ठेवून वापर कमी करावा लागेल.)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्या...
बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आण...
गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची मा...
आपल्या प्रत्येक दाताचे २ भाग असतात – क्राऊन (दाताच...