महाराष्ट्रात नारूचे पूर्ण उच्चाटन झाले आहे. या रोगाचे लांबलचक सुतासारखे जंत असतात. ते पायातून बाहेर पडून पाण्याशी संपर्क आल्यावर अंडी घालतात. पाण्यातला एक बारीकसा किडा (सायक्लॉप्स) ही अंडी गिळतो. या किडयाच्या पोटात ही अंडी वाढतात. माणसाने हे पाणी प्यायल्यावर त्यातून सूक्ष्म जीव बाहेर पडून शरीरात घर करतात, हे जंत वाढतात व हळूहळू प्रवास करून पायात येतात जिथे पाण्याचा संपर्क येतो अशा ठिकाणी ते त्वचेतून बाहेर पडतात आणि अंडी घालतात. सुरक्षित व शुध्द पाणीपुरवठा हाच यावरचा खरा प्रतिबंधक उपाय आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या पाय-या काढून टाकणे ही यातली महत्त्वाची युक्ती होती. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी बोअरचा वापर वाढल्याने नारुचा प्रभाव कमी झाला.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/30/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...