त्वचेखाली रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने पांढरे डागयेतात. मात्र पांढरे कोड का येते याची पूर्ण माहिती आपल्याला अजून तरी नाही. काही प्रकारचे कोड काही प्रमाणात आनुवंशिक आहेत. याचा अर्थ काही वेळा ते पुढच्या पिढयांत उतरू शकतात. पण दिसण्याचा भाग सोडल्यास कोडाचा इतर त्रास अजिबात नसतो. केवळ डागांसाठीच कोडावर उपचाराची इच्छा असते.
कोडासाठी अजून तरी हमखास औषध किंवा उपाय सापडलेला नाही. ब-याच वर्तमानपत्रांत लोकांच्या भावनांचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोडाच्या उपचारांची जाहिरात येते व ती ब-याचदा फसवी असते. कोडाच्या उपचारावर अजून संशोधन चालू असून अल्ट्राव्हायोलेट किरण काही रसायने इत्यादी वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. (याने सुमारे 60-70 टक्के रुग्णास फायदा होतो)
मात्र आयुर्वेदिक पध्दतीत आंतरशुध्दीबरोबर भल्लातक तेल लावतात. याने काही रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचा अनुभव आहे. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञाकडे पाठवावे.
किनवट तालुक्यात उनकेश्वर येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत. या गंधकयुक्त पाण्याचा वापर व वनौषधी उपचारासाठी अनेक रुग्ण येतात. यातल्या अनेकांना गुण आलेला दिसतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/16/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...