অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपले दात जाणून घ्या

दाताची रचना

दाताची रचना

आपल्या प्रत्येक दाताचे २ भाग असतात – क्राऊन म्हणजे शीर्ष आणि रूट म्हणजे मूळ. क्राउन म्हणजे दाताचा दिसणारा भाग जो मूळ हिरडीमध्ये बसविलेला असतो. दातांच्या एकूण लांबीपैकी दोन-तृतियांश भाग मुळाचा असतो. प्रौढ व्यक्तीस ३२ कायमचे दात असतात, अक्कलदाढा धरून.

प्रत्येक दातामध्ये चार प्रकारच्या उती असतात

  • एनॅमल म्हणजे दातावरील पांढरे कठीण आवरण. दाताचे चावताना होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळणे एनॅमलमुळे शक्य होते.
  • डेन्टिन द्वारे एनॅमलला आधार दिला जातो. हे हाडांसारखेच, पिवळ्या रंगाचे व एनॅमलपेक्षा किंचित नरम असते आणि त्यामध्ये काही चेता तंतूही असतात. दातांची खराबी होऊ लागली की ह्या चेतातंतूं द्वारे आपणांस तशी सूचना मिळते.
  • 3 पल्प – हा पदार्थ दाताच्या मध्यभागी असतो. ह्या नरम उतींमध्ये रक्त तसेच लिम्फ व्हेसल्स असतात. ह्या पल्प उर्फ लगद्या सारख्या पदार्थातूनच दाताला खाद्य मिळते आणि आपल्या मेंदूकडे संदेश पाठवले जातात.
  • दाताच्या मुळाचा बराचसा भाग सिमेंटमने झाकलेला असतो. आपल्या जबड्याच्या हाडाशी दात सांधण्यासाठी ह्याची मदत होते. ह्या दोन्हीच्या मध्ये एक गादी सारखा मऊ थर असतो त्यास पेरिओडेंटल लिगामंट म्हणतात. सांधा बनवण्या मध्ये ह्याचाही वाटा असतो.
  •  

    स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

    अंतिम सुधारित : 10/7/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate