वृध्दापकाळात एक महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे दात पडण्याचा. बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्षात बहुतेक सर्व दात पडून जातात. एकदा अन्न चावण्याची क्रिया बंद पडली की त्याचा पोषणावर वाईट परिणाम होतो. यामुळे माणूस खंगतो; आणि यामुळे 5-10 वर्षांनी तरी आयुष्य कमी होत असावे. दात गेल्याने चेहराही एकदम वेगळा दिसायला लागतो. यासाठी वेळीच कवळी बसवून घ्यावी. कृत्रिम दात गरजेप्रमाणे दोन-चार दातांऐवजी किंवा सर्व दातांऐवजी बसवता येतात.सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय किंवा खाजगी दंतवैद्याकडे हे काम होते. एकूण लाभाच्या मानाने यास खर्च फारसा नसतो. काही कारणाने एखादा दात काढला असेल तर त्या जागी नवीन दात बसवून घ्यावा. बाजूच्या दोन्ही दातांना धरून ठेवून नवा दात बसवण्याची एक पध्दत आहे, याला ब्रिज असे म्हणतात. दुसरी पध्दत म्हणजे दात काढघाल करण्याच्या दृष्टीने कवळीप्रमाणेही तेवढा दात लावता येतो. थोडक्यात ही छोटी कवळीच असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावर...
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्...
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही ...
तलाव : सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक वा...