समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्यस तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल ह्याच्याण सर्व प्रकारच्यात शक्येता आहेत. (संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या(मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे) खालील सूचना आपणांस सर्वोत्तम उपयोगी पडतील -
आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या (जिंजिव्हे) त्यांच्याज भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणार्या सवयींचा अवलंब करा. दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी फ्लॉसिंग (दातांमधील फटी दोर्यादने साफ करणे) करा आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. ह्यास जिंजिव्हायटिस असे म्हणतात. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्चा मिळवा. उपचार न केल्यास, जिंजिव्हायटिस खूपच गंभीर होऊन पेरिओडोंटिटिस रोग होईल आणि दात पडू लागतील.
तोंडाच्या आरोग्याची सुरूवात स्वच्छ दातांनी होते. ब्रश करण्याचे हे मूलभूत तंत्र समजून घ्या -
दररोज किमान दोनदा ब्रशने स्वच्छ घासा घाई न करता, हे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ लावून ब्रश करा.
योग्य टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरा: फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा ब्रश वापरा
ब्रशिंगची योग्य पद्धत वापरा: ब्रश दातांसमोर कोनात धरा व कमी अंतरात पुढे-मागे घासा. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभ ही घासा. मात्र फार वेगाने व दाबाने घासू नका अन्यथा हिरड्यांना इजा होईल.
टूथब्रश बदलणे: दर तीन-चार महिन्यांनी नवीन टूथब्रश घ्या — ब्रशचे केस फिस्कारले गेले तर ह्या आधी देखील.
पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहर्याची एकंदर ठेवण चांगली दिसते.
सरते शेवटी, सांगायचे म्हणजे धूम्रपानामुळे तोंडाचे आरोग्य पारच बिघडते. त्याने दात तर काळे पडतातच शिवाय इतर अनेक गंभीर परिणाम होतात.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/3/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...