অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतिसार

दुषित पाणी पिण्यामुळे अतिसार होत असतो.

अतिसार म्हणजे काय ?

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व त्यामुळे त्वचा कोरडी पडते. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यूही येऊ शकतो.

लक्षणे

  • एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ जुलाब
  • जास्त तहान लागणे.
  • डोळे खोल जाणे.
  • जीभ व तोंड कोरडे पडणे.
  • अर्भकामध्ये टाळू खोल जाणे.
  • लघवी थोडी गडद रंगाची होणे किंवा लघवी न होणे.
  • गुंगल्यासारखे किंवा चिडखोर होणे.
  • कातडीस चिमटा काढल्यास अतिशय हळूहळू पूर्ववत होणे.

अतिसारावर उपाय व पथ्य

  • अतिसार झालेल्या व्यक्तीस रोजच्यापेक्षा जास्त पातळ पदार्थ दयावे. उदा. तांदळाची पेज, सरबत, लस्सी, फिका चहा
  • दिवसातून पाच पेक्षा जास्त वेळा पचनास हलके अन्न दयावे.
  • जलसंजीवनी दयावी.

वयाप्रमाणे जलसंजीवनी किती दयावी ते खाली दिले आहे.

  • तीन महिने             - १/२ लिटर
  • सहा महिने ते एक वर्ष    - १/२ लिटर
  • एक वर्ष ते पाच वर्ष      - ३/४ लिटर
  • दोन वर्ष ते पाच वर्ष      - १ लिटर
  • पाच वर्ष ते पंधरा        - २ लिटर
  • पंधरा वर्षाचे वर          - २ ते ३ लिटर

 

स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate