पोलिओ हा मज्जासंस्थेवर पारिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार, अर्धांगवायू किंवा मृत्यु देखील होऊ शकतो. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.
० ते १५ वर्षाखालील खाली बालकांमध्ये शरीराच्या कोणत्याची अवयवाला अचानक आलेला लुळेपणा तसेच संशयित पोलिओ रुग्ण असणा-या कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या शरीराला अचानक आलेला लुळेपणा
पोलिआचा रोग प्रसार हा प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे, दुषित मैलापाणीच्या संपर्कामुळे तसेच अप्रत्यक्षणे दुषित पाणी, दुध किंवा अन्नातून होतो. ८० टक्कयांपेक्षा जास्त रुग्ण हे वयाची तीन वर्षे पुर्ण होण्यापुर्वी आढळतात.
तोंडावाटे देण्यात येणा-या पोलिओ डोसव्दारे रोगाचा प्रभावी प्रतिबंध करता येतो. लसीकरणाच्या वेळापञकाप्रमाणे तोंटावाटे पोलिओ लसीचे डोस नित्यक्रमाने देण्यात येतात. तसेच पुरक लसीकरण (राष्ट्रीय लसीकरण दिवस - NID व उपराष्ट्रीय लसीकरण दिवस -SNID) ५ वर्षे वयापर्यंत राबविण्यात येते.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/30/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...