दृष्टी तपासणी दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून व यंत्राने तपासणी करतात. तक्त्यांवर ओळीखाली ओळीने लहान अक्षरे असतात. निरक्षर लोकांसाठी अक्षरांऐवजी ठिपक्यांचे पुंजके किंवा इंग्रजी सी अक्षराचा बोर्ड असतो. या ऐवजी चित्रांचे तक्तेही मिळतात. सर्वात वरचे आणि मोठे अक्षर निरोगी डोळे असलेल्या व्यक्तीस 60 मीटर्सवरूनही वाचता आले पाहिजे. तसेच सर्वात लहान अक्षर 6 मीटरवरून वाचता यावे. या दोन्हींच्या मध्ये असलेल्या अक्षरांखाली मीटरचा आकडा लिहिलेला असतो. प्रत्यक्षात तपासणीसाठी तक्त्यापासून 6 मीटर दूर उभे राहून तक्ता वाचायला सांगतात.
(खोली लहान असल्यास अंतर वाढवण्यासाठी आरसा वापरतात). तपासताना दुसरा डोळा झाकून एकेक डोळा तपासला जातो. आपल्याला 6 मीटरवरून सर्वात खालची ओळ स्पष्टपणे वाचता आली तर दृष्टी 6/6 म्हणजे'योग्य' आहे असे समजतात (काही व्यक्तींची दृष्टी यापेक्षा चांगली असते व ते 6 मीटरपेक्षा खालची ओळ वाचू शकतात). 6 मीटरवरून फक्त वरची ओळ वाचता आली तर 6/60 म्हणजे अगदी कमी दृष्टी आहे असे समजले जाते.
याप्रमाणे 6/36, 6/24, 6/12, इत्यादी नोंद केली जाते. चष्म्याचा अचूक नंबर काढण्यासाठी नेत्रतज्ज्ञ यंत्राने आणखी तपासणी करतात. दृष्टी फारच अधू झाली असेल तर तक्ते वाचणे शक्य नसते. अशा वेळी हाताची बोटे दाखवून किती आहेत हे मोजावयास सांगतात. बोटे मोजता येतात त्या अंतरावरून दृष्टीचा अंदाज काढता येतो. (उदा. दोन फुटांवरून बोटे मोजता येतात, इ.) पण दृष्टीज्ञान यापेक्षा चांगले असल्यास तक्त्यांचा वापर करावा.
याशिवाय रंगज्ञान तपासले जाते. काही व्यक्ती रंगांध असतात. (अशा व्यक्तीला वाहन चालकाचा परवाना दिला जात नाही) दृष्टीतपासणीत काचबिंदू आहे,नाही याची खात्री करण्यासाठी डोळयातील दाब तपासला जातो. यासाठी बोटाने अंदाज घेता येतो. मात्र अचूक तपासणीसाठी टोनोमीटर लागतो. याचबरोबर नेत्रपटल तपासणी (फंडोस्कोपी) केली जाते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...