फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे. यासाठी जुने रोगट बुबुळ काढून टाकतात व त्या जागी निरोगी (मृत्यूनंतर काढून घेऊन) बुबुळ कलम करतात. ही शस्त्रक्रिया सोपी आहे. पण पुरेसे लोक नेत्रदान करण्यासाठी पुढे यायला हवेत.
आपण नेत्रदानाबद्दल नेत्रपेढीला कळवले, की ते संमतीपत्र भरून घेतात. मृत्यूनंतर नेत्रपेटीला (लगेच) निरोप पाठवला, की मृत व्यक्तीचे डोळे काढून सुरक्षित ठेवतात व पापण्या शिवून टाकतात. यामुळे मृतदेह कुरूप दिसत नाही. मात्र मृत्यूनंतर दोन तासांत हे काम होणे आवश्यक आहे. तोपर्यंत डोळयांवर थंड ओला बोळा ठेवावा. पाळी येईल तसे शस्त्रक्रियेसाठी 2 अंध व्यक्तींना बोलावले जाते. रुग्णाचे आतले नेत्रपटल खराब झाले असेल तर मात्र या शस्त्रक्रियेचा उपयोग होणार नाही. नेत्रदान हे अत्यंत साधे पण महत्त्वाचे मानवतावादी कर्तव्य आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटे...
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय प...
जट्रोफाची लागवड पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर ...
डाळिंबाची लागवड गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे, ...