पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठकिंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते. पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते. रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास पुढील साधा उपाय करावा.
कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते. अशी न जिरल्यास ती शेकाने फुगून फुटते. ती लवकर मोकळी व्हावी यासाठी असा शेक उपयोगी पडतो.
दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी न सुजता जिरून जाते. रांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास तो काढणे आवश्यक असते. पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. दोन-तीन दिवसांत जखम भरून येते. याने उपयोग न झाल्यास किंवा सतत रांजणवाडी येत असल्यास कोझालच्या गोळया घ्याव्यात. यानेही आराम न पडल्यास नेत्र तज्ज्ञाकडे पाठवावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...