अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत पचनसंस्थेचा मार्ग नेहमी वाहता असतो. अन्नपचनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक तेवढा वेळ अन्न या मार्गात राहते व उरलेले पुढे सरकत असते. अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते. या घटनेला आपण 'आतडीबंद' म्हणू या.
अशा अनेक कारणांमुळे आतडयांमध्ये अन्न सरकण्याची क्रिया बंद पडते व'आतडीबंद' उद्भवतो. कधीकधी ही घटना 24 तासांत घडून येते. याउलट कर्करोग,क्षयरोगासारखे कारण असेल तर आतडीबंद होण्यास कित्येक दिवस लागतात.
एकदा पूर्ण 'आतडीबंद' झाला, की पोट खूप दुखते. पोट फुगते व उलटया होतात. सुरुवातीला आतडयांचे आवाज वाढतात, पण नंतर ते मंदावतात (हे आवाजनळीने कळते).
आतडीबंद फार गंभीर घटना असते. याची शंका आल्यावर ताबडतोब रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. बहुतेक वेळा यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...