स्वादुपिंड ही जठर व लहान आतडयाच्या मागे असणारी एक ग्रंथी आहे. या ग्रंथीतून नळीवाटे पाचकरस लहान आतडयात सोडले जातात. तसेच या ग्रंथीत काही विशिष्ट पेशीसमूह 'इन्शुलीन' या संप्रेरकाची निर्मिती करतात. (इन्शुलीनच्या अभावाने किंवा अपुरेपणामुळे मधुमेह हा आजार होतो.)
स्वादुपिंडाचे आजार क्वचित होतात. त्यात मुख्यत: जंतुदोष-सूज, खडा व कर्करोग हे आजार येतात. दारू पिणा-यांमध्ये स्वादुपिंडसूज इतरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. स्वादुपिंडाच्या कर्करोगात - उशिरा- पित्तमार्गावर दबाव येऊन कावीळ होते.
स्वादुपिंडाच्या सुजेची किंवा खडयाची वेदना बेंबीजवळ आढळते. ही वेदना अत्यंत तीव्र व खुपसण्याप्रमाणे असते. या वेदनेने रुग्ण पोट दाबून, हातपाय जवळ ओढून असहायपणे एका कुशीवर पडून राहतो. या आजाराची शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/5/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...