हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे. काही लहान मुलांना बेंबीच्या ठिकाणी असा फुगार दिसतो. हर्नियावर हाताने (किंवा आवाजनळीने) तपासल्यावर आतडयाची हालचाल व आवाज समजतात. हर्निया बोटाने आत ढकलल्यावर आत जातो आणि हात काढून जोर केला तर परत बाहेर येऊ शकतो.
- पोटाचे ऑपरेशन झाले असल्यास (विशेषत: मध्यरेषेवर) काही वर्षानी क्वचित तिथले स्नायू दुबळे पडतात. यामुळे तिथे हर्नियाचा फुगार दिसतो.
- सर्वात जास्त आढळणारा जांघेतला हर्निया असून तो लहान वयात किंवा उतारवयात दिसतो.
- पोटातला दाब वाढल्यावर फुगार होणे ही हर्नियाची एक महत्त्वाची खूण आहे. खोकला करणे, उभे राहणे, वजन उचलणे कुंथणे, शिंकणे, इ. कारणांनी पोटात दाब वाढू शकतो.
- हर्निया हा शस्त्रक्रियेनेच बरा होऊ शकतो. हर्निया स्वत: सहसा दुखत नाही. पण त्यातल्या आतडयाला पीळ पडून 'आतडीबंद' झाला तर खूप वेदना होते. यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागते.
- हर्नियाच्या ठिकाणचा फुगार एकदम वाढणे, दुखरेपणा, गरमपणा, उलटया, इत्यादी लक्षणे गंभीर समजावीत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.