लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते. या उपायांचे सार्वजनिक आरोग्यरक्षणामध्ये सर्वप्रथम महत्त्व आहे.
पचनसंस्थेचे निरनिराळया प्रकारचे संसर्गदोष (जंतू,जंत, इ.) मोठया प्रमाणावर आढळतात. निरनिराळया प्रकारच्या हगवणी, कावीळ, विषमज्वर, पटकी, जंतविकार,इत्यादी महत्त्वाचे आजार यात येतात. नारू, पोलिओ या आजारांची सुरुवात पचनसंस्थेपासूनच होते. आम्लता,जठरव्रण, इत्यादी आजार देखील जंतूंमुळे होतात असे मानले जाते.
आयुर्वेद परंपरेत तर पचनसंस्थेतच अनेकविध आजारांचे मूळ आहे, असे मानतात. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. या काही आजारांशी पचनसंस्थेचा काय संबंध आहे याबद्दल आयुर्वेदाचे मतही मांडले आहे. या प्रकरणांमध्ये आपण या आजारांबद्दल साधे रोगनिदान व उपचार शिकणार आहोत. तसेच पचनसंस्थेच्या आजारांचे निराकरण सार्वजनिक आरोग्याच्या उपायांनी कसे करायचे, हे देखील या प्रकरणात आपण शिकणार आहोत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/23/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...