पोषणात्मक कमतरता तेव्हा होते ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे पोषण घेणे हे सातत्याने शिफारसकृत गरजेच्या खाली राहते. 10-19 वर्षे वयादरम्यानच्या मुलांना जगभरात गंभीर स्वरुपाच्या पोषणात्मक कमतरतांचा सामना करावा लागतो असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
थियामीन, किंवा जीवनसत्व ब 1 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असून ते उर्जा निर्मितीत भूमिका निभावते (अडेनोसिन ट्रायफॉस्फेट-एटीपी आणि नर्व्ह कंडक्शनच्या संश्लेषणाव्दारे). एटीपी हा एक उर्जेचा मोठा स्रोत असून मानवी शरीर त्याचा वापर कार्यासाठी करीत असते. हलके डुकराचे मांस, शिंबाकुलीन वनस्पती आणि यीस्टसारख्या अन्नामधे मोठ्या प्रमाणात सापडते. त्याविरुध्द, पॉलीश केलेला (पांढरा) तांदूळ, पांढरे पीठ, बारीक साखर, चरबी आणि तेले यांच्यात जीवनसत्वे नसतात. थियामिन कमतरतेचा धोका असलेल्या लोकांमधे जे अधिक प्रमाणात मद्यपान करतात, अत्यंत हलाखीच्या अवस्थेत राहतात, कारण अशा लोकांना जीवनसत्वे आणि खनिजांचा पुरेसा साठा मिळत नाही.
बेरीबेरी हे थियामिन कमतरतेचे चिकित्सालयीन स्वरुप आहे. त्याच्या लक्षणांमधे, चेता संस्थेची विकृती (उदा. पायांमधे कंप, स्नायू कमकुवत होणे), पायांवर सूज येणे, नाडीची गती वाढणे आणि हृदय बंद पडणे समाविष्ट आहेत. वेर्निके-कोर्साकॉफ सिंड्रोम ही एक संबंधित स्थिती असून (यात शरीराला झटके येणे, भान नसणे आणि अल्पकालीन स्मृती बिघडणे अशी लक्षणे असतात) ती मद्यपींमधे उद्भवते.
नियासिन (जीवनसत्व बी 3) किंवा मेदाम्ल ट्रीप्टोफॅन, जे नियासिनच्या आधी येते, याची आहारातून कमतरता झाल्यास किंवा ते अजिबात नसल्यास, पेलाग्रा म्हणजेच वल्कचर्म हा रोग होतो. पेलाग्राचा अर्थ आहे खरबरीत त्वचा. त्याच्या प्रारंभिक लक्षणांमधे, स्मृती कमी होणे, त्वचेवर खवलेयुक्त फोड होणे आणि अतिसार यांचा समावेश होतो.
ऑस्टीयोपोरोसिस म्हणजे अस्थिसुशिरता, ही एरवी सामान्य असणा-या हाडाच्या वस्तुमानात घसरण झाल्याने होते. हा एक हमखास आढळणारा चयापाचयिक अस्थीरोग आहे. सामान्य हाड हे कठीण बाह्य कवच (कॉर्टेक्स) आणि स्पिक्युल्स (तंतू) यांच्या अंतर्गत जाळ्यांनी बनलेलं असतं. या तंतुंमुळे हाडांना त्यांची विशिष्ठ मजबुती मिळते. हाडाचे वस्तुमान हे वाढत असते आणि वयाच्या पस्तीस वर्षांच्या आसपास ते स्थिर होते. ही देखभाल हाडाच्या फेररचनेव्दारे केली जाते, ज्यात हाड तोडणे आणि पुन्हा बांधण्याचे चक्र असते. वयाच्या चाळीसाव्या वर्षापासून हाड हे ज्या गतीने बांधले जाते त्यापेक्षा त्याच्या मोडण्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे त्याचे वस्तुमान आणि त्यातील कॅल्शियम कमी होते. महिलांमधे, वयाच्या अनुसार होणारी हाडांची झीज आणि रजोनिवृत्ती तसेच संप्रेरकांच्या पातळीत घसरण होणे (विशेषतः इस्ट्रोजेन) यामुळे हाडाचे विशिष्ठ नुकसान होते. ज्यांना अस्थिसुशिरता होते त्यांच्यामधे हाडाची ही झीज 30-40 टक्के असू शकते, त्यामुळे हाडे कमकुवत होऊन ती तुटू शकतात.
अस्थिसुशिरतेला अनेक घटक कारणीभूत होतात. धूम्रपान, मद्यपान, आणि बैठे जीवन ही व्याधी होण्याचा धोका वाढवण्यास जबाबदार ठरतात. वय आणि लिंग हे देखील भागीदार घटक यात आहेत. इस्ट्रोजेनची पातळी कमी असलेल्या महिलांमधे (उदा. रजोनिवृत्तीनंतर) इतरांपेक्षा अस्थिसुशिरता होण्याची शक्यता अधिक असते. तसंच पुरुषांमधे, सामान्यतः महिलांच्या तुलनेत हाडांची घनता अधिक असते, त्यामुळे ते या स्थितीला कमी बळी पडतात.
एकेकाळी मुडदूस ही बालपणातील एक अत्यंत सामान्य व्याधी समजली जात होती. या रोगाच्या इतिहासात वाकलेले पाय आणि उभारलेले गुडघे असलेल्या मुलांची उदाहरणे दिसून येत.
मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं होतो. वाढीदरम्यान, मानवी हाड हे कॅल्शियम, फॉस्फरस आणि ड जीवनसत्वाच्या आंतरक्रियेने बनवले जाते आणि राखले जाते. कॅल्शियम हे अपक्व हाडामधे साठवले जाते. या प्रक्रियेला कॅल्सीफिकेशन म्हणतात, ज्यामधे, अपक्व हाड हे त्याच्या ज्ञात आणि पक्व अवस्थेत आणले जाते. तथापि, अन्नातून उपलब्ध होणारे कॅल्शियम शोषून त्याचा वापर करण्यासाठी शरीराला ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. मुडदुसमधे, या महत्वाच्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, कॅल्शियम कमी राहते, कॅल्सीफिकेशन कमी होते आणि हाडांचा आकार बिघडतो.
ड जीवनसत्व हे असे एकमेव जीवनसत्व आहे जे अन्नातूनही घेतले जाते आणि शरीरसुध्दा बनवते. दूध, चीज, मासे आणि मांस यांसारख्या प्राणिजन्य चरबीतून ड जीवनसत्व शोषले जात असले तरी, शरीराला एका दिवसात आवश्यक असते त्याच्या केवळ १० टक्के शोषण केले जाते. उर्वरीत 90 टक्के शरीरात निर्माण केले जाते.
सूर्यापासून निघणारे अतीनील किरण त्वचेतील 7-डीहायड्रोकोलेस्टेरॉलला ड-3 जीवनसत्वात रुपांतरीत करते. नंतर त्याचे रुपांतर मूत्रपिंडात कॅल्सीट्रीओल या संप्रेरकात केले जाते (ड जीवनसत्वाचे क्रियाशील स्वरुप). कॅल्सीट्रीओल हे आतड्यात, प्रामुख्याने लहान आतड्यांत, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण करण्यास परवानगी देते आणि मूत्रपिंड तसंच हाडांच्या व्दारे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे संतुलन राखते. पुरेसे ड जीवनसत्व नसेल तर, शरीर हे अन्नातील केवळ 10 ते 15 टक्के कॅल्शियम शोषू शकते. ड जीवनसत्व, कॅल्शियम आणि फॉस्फेटचं हे संतुलन विशेषतः हाडांच्या वाढीला आणि देखरेखीला आवश्यक असते. वयस्क प्रौढांमधे देखील कमतरता होऊ शकते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 4/26/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...