प्रथिने-उष्मांक कुपोषण (पीसीएम) हे अन्नाची कमतरता किंवा अन्नशोषणाचा अभाव यामुळे दिसून येते (यामुळे वाढ खुंटते) आणि क्वाशीओर्कर (प्रथिनांची कमतरता) मेदयुक्त सुज आणि नुकसान याव्दारे दिसून येतात. पीसीएममुळे न्यूमोनिया, कांजिण्या किंवा गोवराचा धोका वाढतो.
आहारातील मेदाम्लांचे प्रमाण वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे असते तेव्हा क्वाशीओर्कर आणि बालशोष सामान्यतः होतात. एक वर्षाचे बालक स्तनपानापासून वेगळे केले जाऊन जेव्हा त्याला कमी पोषक असा आहार दिला जातो तेव्हा विशेषत्वानं क्वाशीओर्कर होतो, परंतु तो वाढत्या वयात केव्हाही होऊ शकतो. बालशोष सहा ते अठरा वर्षे वयाच्या बालकांना स्तनपान न होऊ शकल्याने किंवा तीव्र स्वरुपाचा अतिसार झाल्यास होतो.
तीव्र स्वरुपाचा पीसीएम असलेल्या मुलांमधे त्यांच्या सामान्य वयापेक्षा ती लहान दिसतात आणि शारीरिकदृष्ट्या अक्रियाशील, मानसिकदृष्ट्या दुर्बल आणि वारंवार संक्रमणांना बळी पडणारी अशी असतात. भूक न लागणे आणि अतिसार सामान्यतः होतो.
तीव्र पीसीएममधे, मुलं लहान आणि खुरटलेली दिसतात आणि त्यांना वसा उतक नसते, त्वचा कोरडी आणि लोंबणारी असते आणि केस विरळ, फिकट करडे किंवा लाल-पिवळे असतात. तापमान हे कमी असते, नाडीचा आणि श्वसनाचा वेग कमी असतो. अशी मुले अशक्त, चिडचिडी आणि नेहमी भुकेलेली असतात, मग त्यांना भूक नसणे, मळमळणे आणि उलट्या होत असल्या तरीही.
बालशोषाच्या विरुध्द, तीव्र क्वाशीओर्कर हा रुग्णाची उंची वाढू देतो, परंतु वसा उतक कमी होते कारण चरबीचे रुपांतर उर्जेची गरज भागवण्यासाठी केले जाते. एडीमामुळे स्नायूचा –हास झाकला जातो, कोरडी, सोलणारी त्वचा आणि हीपॅटोमेगाली सामान्य आहेत. दुय्यम पीसीएम असलेल्या रुग्णांमधे बालशोषासारखीच लक्षणे असतात, प्रामुख्यानं वसा उतकाचा नाश होतो आणि शरीराचा आकार हडकुळा होतो, आळस भरतो आणि एडीमा होतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/30/2020
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा.....
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, ...
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व ...
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व ...