क्रॉनिक किडणी फेल्युअर (CKD) मध्ये दोन्ही किडण्या खराब व्हायला अनेक महिने वा अनेक वर्षांचा काळही लागू शकतो. ह्या रोगात सुरुवातीला दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी न झाल्याने कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र जशीजशी किडणी अधिक खराब व्हायला लागते, तसतसा रोग्याचा त्रास वाढू लागतो. किडणीची कार्यक्षमता लक्षात घेऊन रोगाच्या लक्षणांबाबत तीन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागणी करता येईल : (प्राथमिक/ मध्यम/ अंतिम.)
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या सुरुवातीला जेव्हा किडणीची कार्यक्षमता ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होते, तेव्हा रोग्याला कुठलाही त्रास जाणवत नाही.
ह्या अवस्थेत इतर आजारांच्या तपासणीदरम्यान किंवा वैद्यकीय तपासणी दरम्यान बहुतेक रोग्यांत ह्या रोगाचे अचानक निदान होते. ह्यावेळी रक्तात क्रिअॅटीनीन आणि युरियाच्या प्रमाणात केवळ थोडीशीच वाढ झालेली दिसून येते. फक्त सकाळीच चेहऱ्यावर दिसणारी सूज हे ह्या रोगाचे प्रथम लक्षण असते.
३० वर्षाहून कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि औषधे घेऊनही तो नियंत्रणात येत नसेल, तर त्याला किडणी फेल्युअर कारणीभूत असू शकते.
जेव्हा किडणीची कार्यक्षमता ६५ ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होते तेव्हा रक्तातल्या क्रिअॅटीनीन आणि युरियाच्या प्रमाणातही क्रमशः वाढ झालेली दिसते. अशा अवस्थेतही अनेक रोग्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र बहुतेक रोग्यांमध्ये अशक्तपणा, रक्ताची कमतरता, सूज, उच्च रक्तदाब, रात्रीच्या वेळी लघवीच्या प्रमाणात वाढ आदी लक्षणे दिसून येतात.
किडणीची कार्यक्षमता जेव्हा ८० टक्क्यांपेक्षाही कमी होते; म्हणजे किडणी केवळ २० टक्के कार्य करत असते, तेव्हा किडणी फेल्युअरच्या लक्षणात वाढ व्हायला लागते. तरीही अनेक रोग्यांमध्ये औषधोपचारांमुळे तब्बेत ठीक राहते. जेव्हा किडणीची कार्यक्षमता ८५ ते ९० टक्के कमी होते तेव्हा त्याला ‘एन्ड स्टेज किडणी फेल्युअर’ (End stage Kidney Failure) असे म्हणतात. किडणी फेल्युअरच्या अशा अवस्थेत औषधे घेऊनही रोग्याला होणारा त्रास नियंत्रणात येऊ शकत नाही. तेव्हा डायलिसीस किंवा किडणी प्रत्यारोपण आवश्यक ठरते.
किडणी जास्त खराब झाल्यांनतर शरीरातील रक्त शुद्धिकरणाच्या प्रक्रियेत पाणी, आम्ल आणि क्षार यांचे संतुलन ठेवण्याच्या कार्यात कमतरता दिसून येते आणि रोग्याला होणाऱ्या त्रासात वाढ होऊ लागते.
प्रत्येक रोग्यात किडणी खराब होण्याची लक्षणे आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. रोग्याच्या या अवस्थेत आढळणारी लक्षणे पुढीलप्रमाणे :
किडणी फेल्युअरच्या कारणांमुळे त्रासात वाढ झाल्यावरही जर योग्य उपचार केले नाहीत, तर पुढील जीवघेणे त्रास होऊ शकतात.
कोणत्याही रोग्याला होणारा त्रास पाहून किंवा रोग्याच्या तपासणी दरम्यान किडणी फेल्युअर होण्याची शंका वाटली, तर पुढील तपासण्यांद्वारे निदान निश्चित करता येते.
किडणी फेल्युअरच्या रुग्णात ह्याचे प्रमाण कमी असते.
जर लघवीतून प्रथिने जात असतील ही किडणी फेल्युअरची पहिली भयावह निशाणी असू शकते. मात्र किडणी फेल्युअरच्या व्यतिरिक्त अन्य कारणांनीही लघवीतून प्रथिने जाऊ शकतात, हेही शक्य आहे. त्यामुळेच लघवीतून प्रथिने जाणे हे क्रॉनिक किडणी फेल्युअरचे लक्षण आहे असे मानता कामा नये. लघवीतील संसर्गाचे निदानही याच तपासणीद्वारे करता येते.
क्रॉनिक किडणी फेल्युअरचे निदान आणि उपचारांसाठी हि सर्वात महत्वपूर्ण तपासणी आहे. किडणी अधिक खराब होण्याबरोबरच रक्तातील क्रिअॅटीनीन आणि युरियाचे प्रमाण वाढत जाते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांची नियमितपणे ही तपासणी केल्यास, किडणी किती खराब झाली आहे आणि उपचारांची त्यात किती सुधारणा झाली आहे, याची माहिती मिळू शकते.
किडणीच्या डॉक्टरांचा तिसरा डोळा समजली जाणारी ही तपासणी किडणी खराब होण्याचे कारण काय ह्याच्या निदानासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. किडणी फेल्युअरच्या बहुतेक रोग्यांत किडणी संकुचित होऊन आकार छोटा होतो. अॅक्युट किडणी फेल्युअर, मधुमेह, अॅमायलोडोसीससारख्या रोगांमुळे जेव्हा किडणी खराब होते, तेव्हा किडणीच्या आकारात वाढ झालेली दिसते. मुतखडा, मूत्रमार्गात अडथळा आणि पॉलिसिस्टीक किडणी डिसीजसारख्या किडणी फेल्युअरच्या कारणांचे योग्य निदान सोनोग्राफीद्वारे करता येते.
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांच्या रक्तातल्या इतर चाचण्यात, सिरम इलेक्ट्रोलायट्स, कॅल्शीयम, फॉस्फरस, प्रथिने, बायकार्बोनेट आदींचा समावेश असतो. किडणी काम करीत नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांबाबतही रक्ताच्या तपासण्यांपासून माहिती मिळते.
स्त्रोत: Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 4/19/2020
सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया य...