অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किडणीच्या रोगासंदर्भात चुकीच्या समजुती आणि सत्य

किडणीच्या रोगासंदर्भात चुकीच्या समजुती आणि सत्य

  1. गैरसमज 1: किडनीचे सर्व आजार गंभीर असतात
  2. गैरसमज २: किडनी खराब झाल्यास एकच किडनी निकामी होते
  3. गैरसमज ३: किडणीच्या कुठल्याही आजारावर शरीराला सूज येणे, किडणी निकामी झाल्याचे दर्शवतात
  4. गैरसमज ४: किडणी फेल्युअरमध्ये, सर्व रोग्याच्या अंगावर सूज दिसते
  5. गैरसमज ५: आता माझी किडणी ठीक आहे. मला औषध घ्यायची गरज नाही
  6. गैरसमज ६: रक्तात क्रिॅअॅटीनचे प्रमाण थोडे अधिक असले तरी. तब्येत ठीक आहे; मग चिंता करायचे कारण नाही किंवा उपचारांचीही गरज नाही
  7. गैरसमज ७: एकदा डायलिसीस केल्यावर वारंवार डायलिसीस करणे आवश्यक असते
  8. गैरसमज ८: किडनी दान केल्यामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतो
  9. गैरसमज ९: किडनी  प्रत्यारोपनासाठी किडनी विकत घेता येते
  10. गैरसमज १०: किडणी फक्त पुरुषांच्यातच असते, जी दोन्ही पायांच्या मध्ये एका पिशवीत असते
  11. गैरसमज ११ : माझा रक्तदाब सामान्य आहे.त्यामुळे मला आता औषध घेण्याची गरज नाही. मला काही त्रासही नाही , तर मी उगाचच औषध का घेऊ

गैरसमज 1: किडनीचे सर्व आजार गंभीर असतात

सत्य : नाही ,किडनीचे सर्व आजार गंभीर नसतात .त्वरित निदान आणि उपचारांनी किडनीचे बहुतेक आजार बरे होतात.

गैरसमज २: किडनी खराब झाल्यास एकच किडनी निकामी होते

सत्य : नाही , एक किंवा दोन्ही किडन्या खराब होणे हे रोगाच्या प्रकारावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जेव्हा रोग्याची एक किडनी पूर्णपणे खराब होते ,तेव्हा दुसरी किडणी दोन्ही कीडन्यांचे काम करते व रोग्याला कोणत्याही प्रराकारचा त्रास होत नाही. रक्तात क्रिअॅटीनीन  आणि युरियाच्या प्रमाणात कोणतेही परिवर्तन होत नाही.पण जेव्हा दोन्ही किडन्या खराब होतात तेव्हा किडणीद्वारे शरीरातला साफ केला जाणारा कचरा बाहेर निघू शकत नसल्या कारणाने रक्तात क्रिअॅटीनीन आणि युरिया यांचे प्रमाण वाढते .रक्ताची तपासणी केल्यानंतर क्रिअॅटीनीन आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडणी निकामी झाल्याचे दर्शवते .

गैरसमज ३: किडणीच्या कुठल्याही आजारावर शरीराला सूज येणे, किडणी निकामी झाल्याचे दर्शवतात

सत्य  : नाही ,किडणीच्या अनेक रोगांत किडनीचे कार्य सर्वसामान्य असूनही शरीराला सूज येते, जशी नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये येते.

गैरसमज ४: किडणी फेल्युअरमध्ये, सर्व रोग्याच्या अंगावर सूज दिसते

सत्य  : नाही, काही रोगी जेव्हा दोन्ही किडण्या खराब झाल्यामुळे डायलिसीस करतात तेव्हाही सूज नसते .थोडक्यात किडणी खराब झालेल्या अधीकाश रोग्यांच्यात सूज दिसून येते. पण सगळ्यांच्यात नाही.

गैरसमज ५: आता माझी किडणी ठीक आहे. मला औषध घ्यायची गरज नाही

सत्य  : बराच काळ सुरु असलेला किडनी खराब होण्याच्या प्रक्रियेत (CKD) अनेक रोग्यांना उपचारांमुळे लक्षणे कमी झालेली दिसतात असे काही रोगी निरोगी झाल्याच्या भ्रमात राहून स्वतःहूनच औषधे बंद करतात. जे घातक ठरू शकते . औषधे आणि पथ्याच्या अभावामुळे किडणी लवकर खराब होण्याची आणि थोड्याच वेळात रोग्याला डायलिसीसची गरज लागण्याची भीती असते .

गैरसमज ६: रक्तात क्रिॅअॅटीनचे प्रमाण थोडे अधिक असले तरी. तब्येत ठीक आहे; मग चिंता करायचे कारण नाही किंवा उपचारांचीही गरज नाही

सत्य  : हे एकदम  चुकीचे विचार आहेत. क्रीनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यामध्ये क्रिअॅटीनचे वाढलेले प्रमाण तेव्हाच दिसते , जेव्हा दोन्ही किडन्यानची कार्यक्षमता ५०% पेक्षा कमी झालेली असते.जेव्हा रक्तातल्या क्रिअॅटीनीनचे वाढलेले प्रमाण १.६ मिलीग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाल्या आहेत असे म्हणू शकतो.या अवस्थेत लक्षणे दिसून न आल्याने अनेक रोगी उपचार आणि पथ्य पाळण्यात हलगर्जीपणा करतात. परंतु अशा अवस्थेत उपचार आणि पथ्य पाळल्याने सर्वाधिक फायदा होतो. अशावेळी नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी रोग तज्ञ )कडून देण्यात येणारी औषधे दीर्घकाळ किडनीची व शरीराची क्षमता सांभाळण्यासाठी मदत करतात .

सर्वसाधारणपणे राक्तातले क्रिअॅटीनीनचे प्रमाण जेव्हा ५.० मिलीग्रॅम टक्के होते तेव्हा दोन्ही किडन्या ऐंशी टक्के खराब झालेल्या असतात. अशा स्थितीतही योग्य उपचारांमुळे किडनीला योग्य मदत मिळू शकते. परंतु आपल्याला कळले पाहिजे कि ,अशा अवस्थेत उपचारांमुळे किडनीला होणाऱ्या फायद्याची वेळ आपण गमावली तर नाहीना ?

जेव्हा रक्तातले क्रिएटीनीन प्रमाण ८ ते १० मिलीग्रॅम टक्के असते. तेव्हा दोन्ही किडन्या खूपच खराब झालेल्या असतात.अशा स्थितीत औषधे ,पथ्य आणि उपचारांनी किडनी पुन्हा सुधरण्याची संधी आपण जवळपास गमावलेली असते. बहुतेक रोग्यांना अशा अवस्थेत डायलिसीसची गरज पडते.

गैरसमज ७: एकदा डायलिसीस केल्यावर वारंवार डायलिसीस करणे आवश्यक असते

सत्य : नाही. अॅक्युट किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये काही वेळा डायलिसीस केल्यानंतर किडनी पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू लागते.

गैरसमजांमुळे डायलिसीस करण्यात विलंब केल्यास रोगी मृत्युमुखी पडू शकतो.

मात्र क्रॉनिक किडनी फेल्युअरच्या अंतिम टप्प्यात तब्ब्येत नीट ठेवण्यासाठी नियमित  डायलिसीस अपरिहार्य असते.

थोडक्यात किती वेळा डायलिसीस करणे गरजेचे आहे.हे किडनी खराब होण्याच्या प्रकारांवर अवलंबून असते.

गैरसमज ८: किडनी दान केल्यामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतो

सत्य  : नाही . एका किडनीवर सामान्य आयुष्य जगण्यात कोणतीही अडचण येत नाही.

गैरसमज ९: किडनी  प्रत्यारोपनासाठी किडनी विकत घेता येते

सत्य : नाही कायद्याने किडनी विकणे आणि ती खरेदी करणे हे दोन्हीही अपराध आहेत ,ज्यासाठी तुरुंगवासही होऊ शकतो.याशिवाय ,विकत घेतलेली किडनी प्रत्यारोपणानंतर सफल न होण्याची शक्यता अधिक असते ,तसेच प्रत्यारोपणानंतर औषधांचा खर्चही खूप जास्त असतो.

गैरसमज १०: किडणी फक्त पुरुषांच्यातच असते, जी दोन्ही पायांच्या मध्ये एका पिशवीत असते

सत्य : पुरुष आणि स्त्रियांच्यातहि किडनीची रचना आणि आकार एकसारखाच असतो .तो पोटाच्या मागे आणि कमरेच्या हाडाच्या वरच्या दोन्ही बाजूंना असतो.

गैरसमज ११ : माझा रक्तदाब सामान्य आहे.त्यामुळे मला आता औषध घेण्याची गरज नाही. मला काही त्रासही नाही , तर मी उगाचच औषध का घेऊ

सत्य : उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रोगी रक्तदाब आटोक्यात आल्यानंतर  औषध बंद करतात. काही रोग्यांना रक्तदाब अधिक असूनही काही त्रास होत नाही. त्यामुळे ते औषधे घेणे बंद करतात हे चुकीचे आहे.

उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळानंतर किडनी ,ह्दय आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो . अशी स्थिती टाळण्यासाठी कुठलाही त्रास होत नसतानाही योग्य प्रकारे आणि योग्य वेळी नियमितपणे औषधे घेणे आणि पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.

 

स्रोत - Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate