किडनीच्या या रोगानुके कोणत्याही वयात रुग्णाच्या शरीरावर सूज येऊ शकते, परंतु मुख्यत्वेकरून हा रोग छोट्या मुलांत आढळून येतो. योग्य उपचाराने रोगावर संपूर्ण नियंत्रण मिळविल्यानंतरही पुन्हा सूज दिसणे आणि ती वर्षानुवर्ष चालू राहणे हे या रोगाचे वैशिष्ट आहे. बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा सूज येण्यामुळे हा रोग,रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकरिता चिंतेचा विषय होतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर,किडणी शरीरात चाळणीचे काम करते. किडणीमुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ व अतिरिक्त पाणी लघवीद्वारे बाहेर फेकले जाते.
नेफ्रोटिक सिड्रोममध्ये किडनीची चाळणीसारखी असलेली भोके मोठी होतात , ज्यामुळे अतिरिक्त पाणी व उत्सर्जी पदार्थाबरोबर शरीराला आवश्यक प्रोटीन्सहि लघवीवाटे बाहेर पडतात,त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते व शरीराला सूज यायला लागते.
लघवीवाटे बाहेर जाणाऱ्या प्रोटीनच्या प्रमाणावर रुग्णांच्या शरीरावरील सुजेचे प्रमाण कमी जास्त होते. नेफ्रोटिक सिन्ड्रोममध्ये सूज असताना सुद्धा, अनावश्यक पदार्थ बाहेर फेकण्याची किडनीची कार्यक्षमता शाबूत राहते.अर्थातच किडणी खराब होण्याची शक्यता खूपच कमी असते.
नेफ्रोटिक सिन्ड्रोम होण्याचे निश्चित कारण अजून सापडलेले नाही. श्वेतकणांमध्ये लिम्फोसाइटसच्या कार्याच्या अभावाने हा रोग होतो असे मानले जाते. आहारात बदल किंवा औषधांना यासाठी जबाबदार धरणे हे अत्यंत चुकीचे आहे.
बऱ्याचशा रुग्णांत हिमोग्लोबिन , श्वेतकणांची मात्रा इ.ची तपासणी आवश्यकतेनुसार केली जाते.
नेफ्रोटिक सिंड्रोमच्या निदानासाठी रक्त तपासणीत प्रोटीन (अल्बूमीन) कमी असणे व कोलेस्टॉल वाढलेले असणे आवश्यक आहे.सामान्यतः रक्त तपासणीत क्रिअँटीनिनचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे आढळते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेप्रमाणे बऱ्याच वेळा कराव्या लागणाऱ्या रक्ताच्या विशेष तपासन्यांमध्ये कॉम्प्लिमेंट ,ए.एस,ओ.टाइटर ,ए,एन .ए.टेस्ट ,एड्सची तपासणी,हिपेटाइटीस ची तपासणी यांचा समावेश असतो.
3 . रेडीओलॉजिकल तपासणी
या तपासणीत पोटाची ,किडनीची सोनोग्राफी , छातीचा एक्सरे यांचा समावेश असतो.
नेफ्रोटिक सिंड्रोमच्या उपचारांत आहाराचे पथ्य,विशेष काळजी आणि आवश्यक औषधे घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे.
सामान्य उपचार
विशिष्ट उपचार
प्रेडनिसोलॉन नेफ्रोटिक सिंड्रोमच्या उपचाराचे मुख्य औषध आहे.
अधिक भूक लागणे,वजन वाढणे, अँसीडीटी होणे,पोटात व छातीत जळजळने ,स्वभाव चिडचिडा होणे, संसर्ग होण्याची शक्यता वाढणे,रक्तदाब वाढणे इत्यादी .
मुलांचा विकास कमी होणे (उंची न वाढणे) , हाडे कमजोर होणे,चामडी सैल पडल्याने मांड्या व पोटाच्या खालील भागावर गुलाबी चट्टे पडणे,मोतीबिंदू होण्याची भीती असणे.
होय. सर्वसाधारण हे औषधे जास्त प्रमाणात , बराच काळ घेतल्यानंतर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात आणि कमी कालावधीकरीता हे औषधे घेतले,तर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी व कमी काळ असते.
औषधे जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतले जाते. तेव्हा गंभीर व विपरीत परिणामांच्या लक्षणांचे निदान त्वरित होते व त्वरित उपचारही करून त्या परिणामांना कमी केले जाते किंवा थांबवताही येते.
तरीही रोगामुळे होणारा त्रास आणि धोक्याच्या तुलनेत , औषधाचे विपरीत परिणाम कमी हानिकारक असतात. म्हणूनच जास्त फायद्यासाठी थोडे विपरीत परिणाम स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. बऱ्याच मुलांमध्ये उपचारांच्या दरम्यान तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात , लघवीतून प्रोटीन जाणे बंद झाल्यावरसुद्धा सूज राहते. असे का?
प्रेडणीसोलॉनच्या सेवनाने भूक वाढते. जास्त खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे तीन-चार आठवड्यात परत सूज आली असे वाटते.
नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये रोग बळावला कि, साधारणतः डोळ्यांखाली चेहऱ्यावर सूज दिसते.ती सूज सकाळी जास्त व संध्याकाळी कमी होते. त्याचबरोबर पायावरपण सूज येते. औषध घेतल्यामुळे नेहमी चेहरा , खाद्ये आणि पोटावर चरबी जमा होते, ज्यामुळे तिथे सूज असल्यासारखे दिसते. हि सूज दिवसभर समान प्रमाणात दिसते.
डोळे व पायाची सूज न्स्मे,चेहऱ्याची सूज सकाळी जास्त व संध्याकाळी कमी न होणे ,हि सुजेची लक्षणे नेफ्रोटीक सिंड्रोममुळे नाही हे दर्शवतात.
रुग्णाला योग्य उपचार ठरवण्याकरिता सूज येणे व सूज आल्यासारखे वाटणे यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
नेफ्रोटिक सिंड्रोममुळे वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांमध्ये लीव्हामीझॉल मिथाइल प्रेडणीसोलॉन औषधाने ,सायक्लोफॉस्फेसाइड ,सायक्लोस्पोरीन , एम.एम.एफ.इ. औषधांचा समावेश आहे.
खालील परिस्थितीत बायोप्सी केली जाते.
योग्य नियमनासाठी तज्ज्ञांनियमित तपासणी करून घेणे जरुरी आहे. तपासणीमधील संसर्गाचा परिणाम , रक्तदाब , वजन, लघवीतील प्रोटीनचे प्रमाण आणि आवश्यक असल्यास रक्ताची तपासणी केली जाते.या माहितीच्या आधारे डॉक्टर औषधामध्ये योग्य तो बदल करू शकतात.
योग्य उपचारानंतर बहुतांश मुलांमध्ये लघवीतून अल्युमिन जाने बंद होते आणि रोग थोड्याच काळात काबूत येतो. परंतु काही काळानंतर जवळजवळ सगळ्या मुलांमध्ये पुन्हा हा रोग व सूज दिसू लागते आणि अशा वेळी पुन्हा उपचारांची गरज भासते. जसजसे वय वाढते, तसतशी रोग पुन्हा उपचारांची गरज भासते. जसजसे वय वाढते, तसतशी रोग पुन्हा उपटण्याची प्रक्रिया मंदावते. ११ ते १४ वर्षादरम्यान बऱ्याचशा मुलांमध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो.
स्त्रोत - Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 5/27/2020
मानसिक व शारिरीक लक्षणे दाखवणारा आजार म्हणजे डाऊन ...
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल...
कोंबड्यांमधील फ्याटी लिवर आणि हेमोरेज सिंड्रोम हा ...
या विभागात किडनिच्या आजाराचे निदान कसे करता येईल य...