एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीला ‘HIV+’ किंवा एचआयव्ही पॉझिटीव्ह म्हणतात.
एड्सएड्स हे अक्वायर्ड इम्युनो डीफीशियन्सी सिंड्रोमचे लघुनाम आहे
ए- याचा अर्थ अक्वायर्ड म्हणजे संक्रमित झालेला आणि अनुवांशिक किंवा जनुकीय नव्हे.
आय – याचा अर्थ इम्युन म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता
डी – याचा अर्थ डीफीशियन्सी म्हणजे कमतरता
एस – याचा अर्थ सिंड्रोम म्हणजे एखादा विशिष्ट रोग दर्शविणा-या तक्रारी किंवा चिन्हे.
रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात असलेल्या यंत्रणेला नाकाम करुन एचआयव्ही आपल्या शरीरावर हल्ला करतो. कालांतराने, ही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते आणि रोगांचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता शरीर हरवून बसते. अशावेळेला त्या संक्रमित व्यक्तीला विविध रोग होतात.
एचआयव्हीचे दोन प्रकार आहेत – एचआयव्ही - 1 आणि एचआयव्ही – 2. जगभरात एचआयव्ही-1 हाच विषाणू प्रामुख्याने आढळून येतो, आणि सामान्यतः लोक जेव्हा एचआयव्हीचा प्रकार नमूद न करता त्याबद्द्ल बोलतात तेव्हा ते एचआयव्ही-1 चा उल्लेख करत असतात.
एचआयव्ही-1 आणि एचआय़व्ही-2 हे दोघेही शरीरात 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करण्यास कारणीभूत ठरतात, तथापि एचआयव्हीच्या बाबतीत प्रारंभिक संक्रमण आणि आजार यांच्या दरम्यानचा कालावधी हा अधिक असू शकतो.
एखाद्या व्यक्तीला खालील मार्गांनी एचआयव्हीचे संक्रमण होऊ शकतेः
एखादी व्यक्ती ही एचआयव्ही संक्रमित व्यक्तीशी कंडोम न वापरता समागम करते तेव्हा त्याला किंवा तिला संक्रमण होऊ शकते.
संसर्गग्रस्त व्यक्तीच्या शरीरावर वापरलेल्या सुया आणि चाकू, किंवा काही उपकरणेदेखील, योग्यप्रकारे निर्जंतुक न करता अन्य सामान्य व्यक्तीच्या शरीरावर वापरली तर तिला संसर्ग होण्याची शक्यता असते.
एखद्या व्यक्तीला एचआय़व्ही-बाधित व्यक्तीचे रक्त चढवले गेल्यास तिला संक्रमण होण्याची शक्यता असते.
एखाद्या एचआयव्ही-पॉझिटीव्ह मातेकडून तिच्या बाळाला गर्भधारणेच्या दरम्यान किंवा प्रसुतिच्या वेळी विषाणूचे संक्रमण होऊ शकते. स्तनपान हे देखील संक्रमणाचे एक माध्यम होऊ शकते.
एचआयव्ही आणि इतर एसटीआय यांचा परस्परांवर प्रभाव पडतो. एचआयव्ही संक्रमित व्यक्तीमधे एसटीआय उपस्थित असल्यास एचआयव्ही संक्रमणाचा धोका वाढतो.
अशाप्रकारे एचआयव्ही संक्रमण होण्यासाठी त्या सुईमधे संक्रामक विषाणूच्या उच्च पातळीसह संक्रमित रक्त असणे आवश्यक आहे.
रक्ताचा संसर्ग झालेली उपकरणे निर्जंतुक केलेली नसल्यास आणि अन्य व्यक्तीवर वापरल्यास एचआय़व्ही संक्रमणाचा धोका असतो. तथापि शरीरावर टोचवून किंवा गोंदवून घेणा-या लोकांनी सार्वत्रिक खबरदार्या घ्याव्या. ह्या खबरदार्या एचआय़व्ही आणि हिपॅटायटीस बी यांसारख्या रक्तजन्य संक्रमणांचे वहन होणे टाळण्यासाठी तयार केलेल्या आहेत.
आरोग्य सेवा कार्यकर्त्यांना एचआयव्हीचा संपर्क होण्याची शक्यता अगदी कमी असते, विशेषतः त्यांनी सार्वत्रिक आरोग्य निगा खबरदार्यांचे पालन केले असेल तर. एचआयव्हीने दूषित झालेल्या सुया किंवा अन्य तीक्ष्ण हत्यार यांच्यापासून अपघाती जखम होण्याव्दारेच मुख्य धोका संभवतो.
एखाद्या आरोग्यसेवेच्या ठिकाणी एचआयव्हीचे संसर्ग होण्याची शक्यता अगदी क्वचितच असते. सर्व आरोग्यतज्ञांनी कोणत्याही रुग्णाची काळजी घेताना संसर्ग नियंत्रक पध्दतींचे पालन केलेच पाहिजे.
अशाप्रकारे एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. एखाद्या आरोग्य केंद्रामध्ये डोळ्यात रक्त उडाल्याने फारच कमी लोकांना एचआयव्हीचे संसर्ग झाले आहे.
अशाप्रकारे एचआय़व्ही संसर्ग होणे हे असामान्य आहे. चावण्याव्दारे एचआय़व्ही संसर्ग झाल्याच्या केवळ एक-दोन घटना कागदोपत्री नोंदलेल्या आहेत. या प्रकरणांमधे, रक्ताच्या उपस्थितीसोबतच, गंभीर स्वरुपात त्वचा फाटणे आणि त्यामुळे इजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ज्याच्या शरीरात हा विषाणू आहे अशा व्यक्तीशी आपण इंजेक्शनचे सामान सामायिकपणे वापरल्यास आपल्याला एचआयव्हीचे संक्रमण होण्याचा धोका आहे. जर एचआयव्ही संक्रमित रक्त हे त्या सुईच्या आतमधे किंवा सिरींजमधे राहीले आणि अन्य कुणी त्या सुईने स्वतःला इंजेक्शन घेतले तर, ते रक्त त्या व्यक्तीच्या रक्तात ढकलले जाऊ शकते. सुया, सिरींजेस यांचा सामायिक वापर करण्याने विषाणूचे संक्रमण होऊ शकते. असे साहित्य निर्जंतुक केल्याने एचआयव्ही संक्रमणाची शक्यता कमी होते परंतु पूर्णतः नष्ट होत नाही.
एखादी संसर्गग्रस्त महिला आपल्या अद्याप जन्म न झालेल्या बाळाला प्रसूतीच्या आधी किंवा नंतर विषाणूचे संसर्ग करु शकते. एचआय़व्हीचे संसर्ग स्तनपान करवतेवेळी देखील होऊ शकते. आपण एचआयव्ही-संसर्गग्रस्त आहोत असे जर एखाद्या महिलेला माहिती असेल तर आपल्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी करण्यासाठी तिच्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. तसेच सिझेरीयन शस्त्रक्रिया करणे आणि स्तनपान न करवणे यांसारखे अन्य पर्याय ती निवडू शकते कारण स्तनाच्या दुधामधे एचआयव्ही आढळतो.
रक्तदान करणे किंवा रक्त चढवून घेणे याचा अर्थ मी स्वतःला एचआय़व्हीच्या धोक्यात टाकत आहे असा होतो का ?
काही लोकांना संक्रमित रक्त चढवण्यामुळे संक्रमण झालेले आहे. तथापि, बहुतांश देशांमधे, आता रक्त चढवण्यापूर्वी त्याची एचआयव्ही चाचणी घेण्यात येते. ज्या देशांमधे रक्ताची चाचणी घेण्यात येते तिथे रक्त चढवण्याव्दारे एचआयव्हीचे संक्रमण होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ असते.
एचआयव्ही हा शरीराच्या बाहेरुन संक्रमित होतो काय ?
एचआयव्ही हा शरीराच्या बाहेर काही काळ राहू शकत असला तरी, सांडलेले रक्त, वीर्य किंवा अन्य शारीरिक द्राव यांच्याशी संपर्क होण्याने एचआयव्हीचे संक्रमण झाल्याची नोंद नाही. वाळलेल्या रक्तातील अगदी अल्प प्रमाणातील एचआय़व्हीच्या संपर्कात कुणी आलाच तर त्यामुळे संक्रमण होईल असे समजण्याचे कारण नाही. एचआय़व्ही हा वातावरणात चांगला तग धरु शकत नाही यावर शास्त्रज्ञ सहमत आहेत, त्यामुळे वातावरणातून संक्रमण होण्याची शक्यता जवळपास नाही. एचआयव्ही-संक्रमित मानवी रक्त किंवा शारीरिक द्राव वाळल्याने वातावरणातून संक्रमण होण्याचा सैध्दांतिक धोका आजवर केलेल्या निरीक्षणांनुसार शून्य आहे. प्रयोगशाळेतील अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांचा अर्थ चुकीचा लावला गेल्यामुळे काही लोक विनाकारण सजग होतात.
सुंता केलेल्या पुरुषांना समागमाव्दारे एचआयव्हीचे संसर्ग होण्याचा धोका 70 टक्के कमी असतो असे संशोधनातून दिसून आले आहे. याचे कारण असे की पुरुषाच्या लिंगाच्या पुढच्या कातडीची आतली बाजू एचआयव्हीला विशेषकरुन बळी पडू शकते असे समजले जाते. तथापि, सुंता केलेली असणं याचा अर्थ आपणांस एचआयव्ही संसर्ग होणारच नाही असं समजू नये, त्यामुळे केवळ संसर्गाची शक्यता कमी होते. सुंता केलेले पुरुष हे ज्यांच्या लिंगावरील पुढची कातडी काढलेली नाही अशा पुरुषांइतकेच विषाणूचा प्रसार करु शकतात.
आपण उपचार घेत असाल किंवा आपल्यामधे एचआयव्हीची अगदी कमी पातळी असेल तरीसुध्दा, तो विषाणू पूर्णतः काढून टाकता येत नाही आणि त्यामुळे आपण इतरांसाठी संसर्गजन्य ठरु शकता.
अंतिम सुधारित : 7/12/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...