एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीस कधी ना कधी टी.बी. जंतूंची लागण होऊन गेलेलीच असते. बहुतेकांची टी.बी. लागण बरी झालेली असते पण काही जंतू शिल्लक असतातच. ते एक प्रकारे पांढ-या पेशींच्या तुरुंगात असतात. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात. त्यांची संख्या वाढायला लागते. यातूनच टी.बी. आजाराचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच टी.बी. एड्सचा एक साथीदार असतो. सध्या भारतात टी.बी. रुग्णांपैकी 15% रुग्ण एड्सग्रस्त असतात.
एड्समध्ये होणारा टी.बी. फारशी लक्षणे नसलेला, झाकलेला आजार असू शकतो. मात्र त्यांच्या फुप्फुसात टी.बी.चे पुष्कळ जंतू आढळतात. ते बेडक्यात मोठया संख्येने दिसतात. फुप्फुसे मात्र क्ष-किरण चित्रात निरोगी दिसतात आणि खोकला, बेडक्यात रक्त वगैरे टी.बी.ची नेहमीची लक्षणेही दिसत नाहीत.
एड्स रुग्णांना फुप्फुस सोडून इतर टी.बी. चा आजारही सहज होऊ शकतो. यात पाठीचे मणके, जननसंस्था, मेंदू-आवरण वगैरे जागांमध्ये टी.बी. होऊ शकतो.
टी.बी.चा आजार झाला की शरीरात एड्स वेगाने वाढायला मदत होते.
एड्सच्या रुग्णांना कमी प्रतिकारशक्तीमुळे टी.बी.ची नवी जंतुलागणही सहज होऊ शकते. जेव्हा हे रुग्ण सामान्य रुग्णालयात जातात तेव्हा इतरांचे जंतू त्यांना सहज लागू शकतात.
एड्स आणि टी.बी. रोगाचे असे विशेष नाते आहेत. यामुळे एड्स असेल तर टी.बी. ची तपासणी करावी लागते. तसेच टी.बी असेल तर एड्स ची तपासणी करावी लागते.
म्हणूनच प्रत्येक एड्स रुग्णाला टी.बी. होऊ नये म्हणून 2 टी.बी. प्रतिबंधक औषधे ६ महिने देणे उपयोगाचे आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 1/29/2020
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यास...
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच ...
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक...
१९८६ मध्ये मुंबईतून एड्सची पहिली केस दाखल झाली.