गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो.
सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही – 2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते. ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसेल अशा जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.
एचएसव्ही-2 चे संक्रमण झालेल्या बहुतांश लोकांना आपल्याला संक्रमण झाले आहे याची माहिती नसते. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर त्याचा पहिला उद्रेक हा सामान्यतः दोन आठवड्यांच्या आत होतो, आणि त्याचे फोड हे दोन ते चार आठवड्यांच्या आत बरे होतात.
जेव्हा चिन्हे दिसतात, तेव्हा ती गुप्तांग किंवा गुदव्दाराच्या वर किंवा आसपास एक किंवा अधिक फोडांच्या स्वरुपात दिसतात. हे फोड फुटतात, आणि तिथे नाजुक चट्टे तयार होतात जे पहिल्यावेळी बरे होण्यास दोन किंवा चार आठवडे घेतात. दुसरा उद्रेक हा पहिल्यानंतर अनेक आठवडे किंवा महिन्यानी होतो, तो पहिल्यापेक्षा कमी तीव्रतेचा आणि कमी कालावधीचा असतो. हे संक्रमण शरीरात अमर्याद काळापर्यंत राहू शकत असले तरी, काही वर्षांच्या काळात त्याचे उद्रेक हे कमी होऊ लागतात. अन्य चिन्हे आणि लक्षणांमधे फ्लूसारखी लक्षणे, ताप आणि सुजलेल्या ग्रंथींसह दिसून येतात.
नागीण बरी करु शकतील असे उपचार नाहीत, परंतु विषाणूविरोधी औषधे रोगी जोवर घेत राहील तोवर उद्रेक कमी करता येतात किंवा टाळले जातात. त्याशिवाय, लक्षणांवर आधारित नागिणीसाठी दैनंदिन प्रतिबंधात्मक उपचार केल्याने ती जोडीदाराला होण्याची शक्यता कमी करता येते.
समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावेत ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नाही याची खात्री आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/2/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...