बीजांडास पीळ पडणे - बीजांड चेंगरणे
बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा (बंडल) असतो. याच्या टोकाला खाली बीज़ांड असते. जर या रक्तवाहिन्यांना पीळ पडला तर रक्तप्रवाह थांबतो व वेदना सुरू होतात. या वेदना कधीकधी पोटदुखीसारख्या असतात. म्हणून तीव्र पोटदुखी असताना बीजांडाची तपासणी करणे आवश्यक असते. या वेदना भयंकर असतात. वेळ न दवडता ताबडतोब शस्त्रक्रिया करून पीळ उलगडला नाही तर त्या बाजूचे बीजांड निर्जीव होते. उशीर झाल्यास ते काढून टाकण्याशिवाय उपाय उरत नाही. अशा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात पाठवले पाहिजे.
कधीकधी अपघाताने किंवा मार लागल्याने बीजांड चेचले जाते. याची वेदना भयंकर असते आणि वेदनेमुळे मृत्यूही येऊ शकतो. या बाबतीतही ताबडतोब तज्ज्ञांकडे पाठवणे आवश्यक असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 6/23/2020
बुबुळाचा दाह होऊन जखमझाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष य...
बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान ...
बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी का...
पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया...