लैंगिक इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या लैंगिकतेत काही महत्त्वाचे फरक आहेत. एकतर प्राणीवर्गात लैंगिक प्रवृत्ती बहुशः ऋतुप्रमाणे कमी जास्त होते; मानवात ती सर्व ऋतूंमध्ये, कधीही जागृत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे प्राण्यांमध्ये लैंगिक जोडीदार निवडण्यात काही स्वातंत्र्य असते, मात्र लग्नसंस्थेमुळे मानवाने त्याबद्दल काही बंधने स्वीकारलेली आहेत. लग्नाची व्यवस्था नसती तर पशूंप्रमाणे 'बळी तो कान पिळी' हा न्याय लागू झाला असता. लग्नांचा तोटा म्हणजे काही जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या सहन करायला लागणे, आणि काहींना लैंगिक असमाधान. बलात्कार हा शाप बहुतेक मानव समाजामध्ये आहे, पशूंमध्ये तो नाही हाही फरक आहे. अनेक लोक लैंगिक असमाधानाने त्रस्त असतात. यासाठी कोणी काही औषध सुचवले तर काहीही खर्च करायला तयार असतात. योग्य सल्ला उपचार मिळण्याची सर्वत्र सोय नसल्याने या क्षेत्रात फसवेगिरी पुष्कळ आहे. वर्तमानपत्रात अशा पुष्कळ जाहिराती नित्य आढळतात. या समस्यांबद्दल महत्त्वाची काही माहिती आपल्याला असायला हवी.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चा...