लिंगसांसर्गिक आजारातील 'गोनोरिया' (परमा) व इतर काही 'पू' निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो.
हा आजार अचानक उद्भवला असल्यास खूप वेदना, लघवी गढूळ होणे, ताप, लघवी वारंवार होणे, इत्यादी त्रास संभवतो. भरपूर पाणी पिणे व जंतुविरोधी औषधांनी आराम पडतो. पण याचे उपचार डॉक्टरकडूनच व्हावेत. काही वेळा ही सूज क्षयरोगाचीही असू शकते आणि ती खूप वर्षे राहते.
लघवीतून 'धातू' जाणे अशी तक्रार केली जाते तेव्हा बहुधा असा वीर्यकोशाचा आजार असू शकतो. या आजारामुळे लघवीच्या सुरुवातीला पू, गढूळ भाग बाहेर पडतो व नंतर स्वच्छ लघवी येते. अशी तक्रार आढळली तर तज्ज्ञाकडे पाठवावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 6/22/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...