महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्या देशातील निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष शेतीव्यवसायात गुंतलेली आहे. शेतांवर मुलाबाळांसकट शेतक-याचे कुटुंब राबत असते. व्यापक अर्थाने अनेक आजार शेतीजन्य आहेत. यात सर्पदंश, कुत्री चावणे,जनावरांमुळे होणा-या जखमा, मातीमधून होणारे जीवजंतूजन्य आजार (उदा. जंतकृमी), विजेचे अपघात,मलेरिया, प्लेग, इ. आजार हे सर्व शेतीशी जास्त संबंधित आहेत. खराब रस्ते आणि अपु-या आरोग्यसेवांमुळे यातला धोका अधिकच वाढतो. शेती हा व्यवसाय आहे हे एकदा मान्य केले की त्यातील व्यवसायजन्य आजार,अपघातांची नोंद करण्याची मनोवृत्ती तयार होईल. मुळात हा व्यवसाय आर्थिक दृष्टया दुर्बल असल्याने त्यातून या आजारांवरची उपाययोजना, भरपाई होणे दुरापास्तच असते. यासाठी आरोग्य विमा योजना उपयोगी होऊ शकतात. पण आरोग्यविमा पॉलिसीतून मिळणारी भरपाई व प्रत्यक्ष बिले यांचा मेळ बसत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...