बहुतेक वेळा मेंदूला रक्तपुरवठा करणार्या एखाद्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्यास मेंदुच्या त्या भागाला पुन्हा रक्तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, ज्यामुळे जास्त नुकसान होत नाही.
स्ट्रोकचे आणखी एक वॉर्निंग लक्षण म्हणजे ट्रान्जियंट इस्केमिक अटॅक (TIA). ह्याचा अर्थ म्हणजे लहान पक्षाघात ज्यामध्ये वरील लक्षणे अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये दिसू शकतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. TIA असलेल्या लोकांना कालांतराने पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते. जर TIAची लक्षणे तुमच्यात आढळून आली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधा.
शक्यतांबाबत तुमच्या फॅमिली डॉक्टरशी बोला (वरील शक्यता पहा) आणि तुम्ही कशाप्रकारे धोका टाळू शकता हे पहा. तुमचा धोका टाळण्यासाठी तुम्ही करू शकत असलेले काही उपाय येथे दिले आहेत:
पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्या डॉक्टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्या रक्तामध्ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/26/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...