उठल्याबरोबर दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे शौचाला जाऊन येणे, शौचाला नियमित आणि वेळेवर जाण्याची सवय लावून घ्यायला हवी. चहा, विडी, मिश्री इत्यादी उत्तेजक पदार्थांमुळे शौचाला साफ होते ही अत्यंत चुकीची समजूत आहे. उलट हे पदार्थ शरीरास अपायकारक आहेत. शौचाला जाताना पाणी घेऊन जावे. शौचावरून आल्यानंतर हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत.
पोट साफ होण्यासाठी आहारामध्ये पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. रोज पोटपूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. शौचास जाण्याकरिता शौचालयाचाच वापर करावा. शक्यतो उघडयावर शौचास बसू नये. त्यामुळे अनेक रोगांना स्वतःहून आमंत्रण दिल्या सारखे आहे.
स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...