सूत्रण हा जीर्ण यकृत रोगाचा परिणाम असून त्यात यकृतावर व्रण पडतात आणि त्याचे कार्य बिघडते. यात ब-याचदा अनेक गुंतागुंती असतात, त्यामधे ओटीपोटात पाणी जमा होणे, रक्तस्त्रावाचा विकार, यकृताच्या रक्तवाहिन्यांमधे रक्तदाब वाढणे, आणि संभ्रम किंवा जागृतीच्या पातळीत बदल होणे.
लीव्हर सि-हॉसिस
सूत्रण हा जीर्ण यकृत रोगामुळं, संक्रमण आणि दीर्घकाळ मद्यपान केल्यानं होतो (अल्कोहोलिक यकृत रोग पाहा). अन्य कारणांमधे, हिपॅटायटीस ब, औषधे, यकृताचे स्वयंप्रतिकार दाह, यकृताच्या स्वच्छता यंत्रणेचा विकार.
या रोगाशी निगडीत असू शकणारी आणखी लक्षणे
लक्षणे ही हळूहळू वाढतात, किंवा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
शारीरिक तपासणी केली असता, वाढलेले यकृत किंवा प्लीहा, ओटीपोटाचा आकार बदलणे, पिवळे डोळे किंवा त्वचा (कावीळ), त्वचेवर लाल कोळ्यासारख्या रक्तवाहिन्या, स्तनांचा आकार वाढणे, पुरुषांमधे लहान वृषण, हाताचे तळवे लाल होणे, आखुडलेली बोटे, किंवा ओटीपोटाच्या भिंतीतील शिरा फुगणे अशी लक्षणे आढळू शकतात.
चाचण्यांमधे पुढीलसह यकृताच्या समस्या दिसू शकतातः
यकृताची बायोप्सी केल्यास सूत्रणाची खात्री होते.
अति मद्यपान करु नये. आपले मद्यपान प्रमाणाबाहेर जात आहे असे लक्षात आल्यास, तज्ञांची मदत घ्या. शिरेतून अमली पदार्थ घेणे टाळल्यास (किंवा केवळ स्वच्छ सुया वापरल्यास आणि दुस-याचे उपकरण कधीही न वापरल्यास) हिपॅटायटीस ब आणि क चा धोका कमी होतो. काही संशोधनातून दिसून आले आहे की हिपॅटायटीस क हा स्ट्रॉ सामाईकपणे वापरल्यास किंवा कोकेन आणि इतर पदार्थ नाकाव्दारे ओढण्याचे साहित्य एकमेकांनी वापरल्यास पसरतो. नाकाव्दारे अमली पदार्थ ओढणे किंवा संबंधित वस्तु एकमेकांना देणे टाळावे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/1/2020