अनेक व्यसनांची सुरुवात गमतीत होते. कधी मित्रमंडळीत गंमत म्हणून, कधी कुतूहल तर कधी धाडस म्हणून या पदार्थांचा संबंध येतो. ही झाली तोंडओळख. यापुढच्या पायरीत ती व्यक्ती स्वत:हून कधीकधी 'सहज' हे पदार्थ वापरून बघते. एकदा सतत सेवनाची पायरी गाठली, की ती व्यक्ती त्या पदार्थाच्या पूर्ण आहारी जाते. तो पदार्थ जर मिळाला नाही तर त्रासदायक शारीरिक, मानसिक लक्षणे दिसतात. उदा. सतत दारू पिणा-याला एखादा दिवस दारू मिळाली नाही तर अंगाची थरथर, उन्मादी अवस्था होते.
या पायरीवर व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेतही कायमचे बदल होत जातात. उदा. पैशासाठी खोटे बोलणे, चोरी, आक्रमकता, असहायता, इत्यादी गोष्टी स्वाभाविक होऊन जातात.
या अवस्थेत व्यसनाधीन व्यक्तीच्या स्वभावात कायमचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. उदा. दारू पिणा-यामध्ये यकृताला सूज येणे, हातापायांना मुंग्या येणे, मेंदूत कायमचे दोष तयार होणे, स्वभावात अनेक दोष स्थिर होणे, इत्यादी. या अवस्थेत कितीही मदत केली तरी ती व्यक्ती सुधारण्याची फारशी शक्यता नसते. अशी व्यक्ती समाजातून बाहेर फेकली जाते. तरीही आपण व्यसनमुक्तीचे प्रयत्न सोडू नयेत.
पहिले सूत्र म्हणजे लवकरात लवकर व्यसन ओळखणे. विशेषतः गर्द, इत्यादी अतिमादक पदार्थांच्या व्यसनांमध्ये नंतर केलेले उपचार फारसे यशस्वी होत नाहीत. सहजसेवनाच्या पायरीवर व्यसन थांबवणे अगदी महत्त्वाचे असते. एकदा त्या पदार्थाच्या आहारी गेल्यावर व्यसन थांबवणे थोडया लोकांच्या बाबतीतच शक्य होते.
दुसरे सूत्र म्हणजे व्यसन रोखण्याबरोबरच इतर पूरक आधार देणे. रुग्णालयात दाखल करणे, रुग्णांच्या गटांवर एकत्र उपचार, मानसोपचार करणे, समाजात पुन्हा सुस्थिर करणे, मानसिक आधार देणे, इत्यादी प्रयत्न केले तर उपयोग होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/1/2020
गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या ...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेरेब्रल...
सर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक ...
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लो...