व्यसन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळयांत मोठे उदाहरण म्हणजे दारू. याशिवाय यात भांग, गांजा, अफू गर्द व तंबाखू येतात. व्यसने ही पुरातन आहेत. काही लोक त्याला कडाडून विरोध करतात. समाजकंटक आणि सरकारला व्यसनांपासून आर्थिक उत्पन्न मिळते पण अगणित कुटुंबांची दैना होते. कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. जगातल्या दहशतवादी चळवळीही यावरच पोसतात. व्यसनांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणी यंत्रणा मधल्यामध्ये गबर होऊन जाते असा अनेक देशांमधला अनुभव आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे संकट नाही. देशच्या देश या समस्येने त्रस्त आहेत. गावातही आपण दारूगुत्त्यांचे साम्राज्य व राजकारणातील त्यांचे वर्चस्व ओळखून असतो.
पूर्वी व्यसने नव्हती असे नाही, पण त्यावर काही लगाम होते. पूर्वी सर्व समाज श्रमावर जगणारा होता, काम नसलेल्या व्यक्तींची संख्या कमी होती. आता आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने दरडोई-सुबत्तेचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे पूर्वी दारू कुटुंबाने एकत्र बसून घ्यायचा एक विरंगुळा होता. त्याने फारसे झिंगणे किंवा बेलगाम होणे शक्य नव्हते. व्यसने ही अधिक वैयक्तिक होत गेली तशी ती अनियंत्रित होत गेली. अनेक कुटुंबांत एखादा मनुष्य व्यसनी झाल्याचे उशिरा कळते; तोपर्यंत इतरांना कल्पनाही येत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...
वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी,...
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण...
शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घ...