नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. तर त्यासाठी सर्व अवयव चांगले घासून चोळून आंघोळ करावी. उघडयावर आंघोळ व्यवस्थित होत नाही. जर आंघोळीच्या जागी चारहि बाजूंनी काड्या लावून बारदान बांधून आडोसा तयार करून व्यवस्थितपणे आंघोळ करता येईल ते पहावे. आंघोळ केल्यावर खरबरीत पंचा/ टॉवेलने अंग कोरडे करावे. अगदी मऊ फडक्याला अंग नीट पुसले जात नाही व कातडी कोरडी होत नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र टॉवेल वापरावा. एकच टॉवेल वापरल्यामुळे त्वचेचे आजार लवकर पसरतात. रोज स्वच्छ पाण्याने व साबणाने अंग चोळून आंघोळ करावी. शक्य असल्यास सकाळ व संध्याकाळी दोन वेळेस करावी.
केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवडयातून एकदा तरी केस धुवावेत. यासाठी शिकेकाई/ रिठा यांचा केस धुण्यासाठी वापर करावा. केस धुतल्यावर ते पुसून चांगले वाळवावेत. तसेच केस दररोज विंचरावेत. म्हणजे उवा होणार नाहीत. नाहीतर उवा, कोंडा, लिखा केसात होऊ शकतात. त्यातून उवा झाल्याच तर गोडेतेल व कपूर एकत्र करून केसांना लावावा.
स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/11/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...