दुकानात मिळणा-या खोकल्याच्या बहुतेक औषधात एखादा गोड पदार्थ, मद्यार्काचे काही प्रमाण, बेडका सुटण्यासाठी मदत करणारा एक क्षार वगैरे पदार्थ असतात. या औषधांमुळे खोकला थोडासा कमी झाला असे वाटते. एवढा परिणाम सोडला तर खोकल्याच्या बहुतेक औषधांचा उपयोग होत नाही. मूळ रोगच बरा व्हायला पाहिजे. खोकला हे केवळ लक्षण आहे. खोकला दाबण्याचे एक औषध (कोडीन) मिळते. त्याचा वापर मर्यादितच झाला पाहिजे.
कोरडया खोकल्यात खडीसाखर, बाळहिरडा, इत्यादी चघळायला देणे हा एक चांगला उपाय आहे. खोकल्यात जास्त पाणी प्यायल्याने बेडका सुटायला मदत होते. हळद-दुधानेही वरवरचा खोकला (विशेषतः घसासूज) कमी होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासा...
काही वेळा गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भाच्या आरो...
औषधांच्या काम करण्याच्या पध्दतींवरून औषधांचे पुढील...
आयुर्वेदाने औषधे तयार करण्याच्या वेगवेगळया पध्दती ...