फुप्फुसाचा कर्करोग हा उतार वयातला एक गंभीर आजार आहे. विशेषतः धूम्रपान करणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची 30 पटीने जास्त शक्यता असते. प्रदूषणामुळे याचे प्रमाण वाढत आहे. ऍस्बेस्टॉस धुळीमध्ये राहणा-यांना या आजाराचा विशेष धोका आहे. यामुळे अनेक देशांमध्ये ऍसबेसटॉसच्या वापराला बंदी घातली आहे. इतर अनेक कर्करोगांच्या रक्त प्रसारानंतर फुप्फुसामध्ये गाठी होतात. या अवस्थेत हा असाध्य आजार असतो.
खोकला येत राहणे, बेडक्यात रक्त पडणे ही यातली मुख्य लक्षणे आहेत. भूक मंदावणे,वजन घटणे, छातीत दुखणे, गिळायला त्रास, इत्यादी लक्षणेही दिसतात.
या रोगाचे निदान छातीच्या चित्रानेच होऊ शकते. यासाठी आता प्रगत तंत्रे (उदा. सी.टी. स्कॅन) उपलब्ध आहेत. प्राथमिक अवस्थेत शस्त्रक्रिया करून उपाय करता येतो. पण रोग जास्त पसरला असेल तर काही महिन्यांत मृत्यू संभवतो.
या आजारावर मुख्य प्रतिबंधक उपाय 'धूम्रपान न करणे' हाच आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/25/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे....
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्...