सर्दीपडशात काही वेळा या पोकळयांमध्ये दाह सुरू होतो. बहुधा हा दाह जिवाणूंमुळे होतो. जेथे दाह होतो ती पोकळी जड होते व नंतर पू भरून ठणकते. जी पोकळी ठणकते त्यावर दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. डोळयाखालच्या किंवा कपाळावरच्या सायनस पोकळयांचे दुखणे अशाने सहज समजते. मात्र नाकामागील अंतर्भागात पोकळी सुजली असेल तर वरून कळत नाही. अशा वेळी फक्त डोके ठणकत राहते. ही डोकेदुखी बहुधा कानापुढच्या खोलगट भागात असते.
हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला,सिलिशिया
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...