असांसर्गिक कुष्ठरोगात तात्पुरते दोन तीन चट्टे किंवा एखादी नस सुजणे एवढेच घडते. यातले चट्टे जाडसर किंवा सपाट, आखीव पण बधिर असतात. चेता/नस सुजली असेल तर ती दुखते. पुढचा संबंधित भाग बधिर होतो किंवा स्नायूंची शक्ती कमी होते. काळजी घेतली नाही तर बधिरतेमुळे भाजणे, जखम होणे साहजिकच. या आजारात हे न भरून येणारे व्रण (जखमा) पावलाच्या तळव्यांना लवकर होतात. काही वेळा हा कुष्ठरोग प्रकार जास्त पसरून बरेच चट्टे येतात किंवा एकाच वेळी अनेक नसांना सूज येते. या सर्व नसा दुखतात. त्या त्या नसांच्या जागी दाबून हा दुखरेपणा समजतो.
हा आजार फारसा संसर्गजन्य नसतो. कारण यातले जंतू श्वसनसंस्थेत फार नसतात, तर ते बहुधा नसांमध्ये असतात
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
या योजनेचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातले स...
एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्...
कुष्ठरोग ही एक अनादि काळापासून चालत आलेली मानवी स...
एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्...