काही आजार एकेकटे येतात, तर काही साथींच्या स्वरूपात. साथ म्हणजे एकावेळी अनेकांना आजार.
ताप, थंडीताप, सर्दी, खोकला, हगवण, पोलिओ वगैरे आजारांची आपल्याला माहिती आहे. या सर्व आजारांचे कारण रोगजंतू असतात. काही आजारांचे रोगजंतू एकमेकांकडे सहज पसरतात. असे काही आजार साथीच्या स्वरूपात येऊ शकतात. देवी, प्लेग, पटकी वगैरे आजारांच्या साथीबद्दल आपण ऐकलेले असते. आता देवीचा आजार संपला. प्लेगचा आजार कधी कधी येऊ शकतो. पटकीची साथ आता पूर्वीसारखी येत नाही. मात्र काही आजार अजून साथीने येऊ शकतात. डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), हगवण-जुलाब, फ्ल्यू ताप, गोवर, गालगुंड, मेंदुज्वर, लेप्टो, डोळे येणे,घसासूज, कांजिण्या हे आजार साथीने येऊ शकतात. या आजारांची थोडक्यात माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे.
काही आजार रोगजंतूंमुळे येतात, पण ते सहसा साथीने येत नाहीत. कुष्ठरोग, टी.बी.,हत्तीरोग, एड्स वगैरे आजार दीर्घ मुदतीचे म्हणजे महिनोन्महिने चालणारे असतात. या आजारांची सहसा साथ नसते, पण त्यांचे समाजात प्रमाण जास्त असेल तर आपण त्याला 'प्रादुर्भाव' म्हणतो.
काही आजार एकेकटया माणसांना होतात. कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह वगैरे आजारांची साथ येत नाही. 'साथ' हा शब्द सांसर्गिक आजारांसाठीच आहे. हे आजार एकमेकाला लागत नाहीत, पण या आजारांचे समाजातले प्रमाण वाढू शकते. या आजारांची 'लाट' येऊ शकते, म्हणजे प्रमाण अचानक वाढू शकते. याचा अभ्यास व्हायला पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/2/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...