कांजण्या ' हा ' व्हॉरिसेल्ला झोस्टर ' या विषाणूंपासून मोठ्या प्रमाणावर होणारा संसर्गजन्य रोग आहे . हा रोग प्रामुख्याने १० वर्षांखालील मुलांना होतो . मुलांना लहान वयात कांजण्या आल्या नसतील तर मोठेपणी कांजण्या येण्याची शक्यता असते . कांजण्या येताना आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत जेणेकरून आजाराची तीव्रता आटोक्यात राहील . कांजण्याविरुद्ध लस उपलब्ध आहे . परंतु ती अतिशय महाग आहे .
वैद्यकीय सल्ल्यानुसार जन्मापासून १३ वर्षांपर्यंत कधीही कांजण्या न झालेल्या व्यक्तीस अति तीव्र स्वरूपात कांजण्या होऊ नयेत म्हणून लसीकरणाचा सल्ला देण्यात येतो . राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही व कांजण्याचे निर्मूलन वस्तीपातळीवर शक्य नाही .
पुरळांची वैशिष्ट्ये
कांजिण्यावरती आता एक लस उपलब्ध असून ज्याला हा रोग झालेला नाही आणि ज्याच्या शरीरात कांजिण्याचा प्रतिकार करण्यासाठी पुरेसे प्रतिपिंड नाहीत अशा बारा वर्षे वयापेक्षा जास्त वयाची कोणातीही व्यक्ती ती घेऊ शकते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/31/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...