निरनिराळया पदार्थांच्या आणि वस्तूंच्या जंतुनाशनाच्या अनेक पध्दती आहेत
वस्तू उकळणे, वाफारणे,उन्हात ठेवणे, जाळणे,इत्यादी अनेक पध्दती आहेत. पाणी, हत्यारे 10ते 15 मिनिटे उकळणे,कपडे कडक उन्हात वाळवणे (अंशतः जंतुनाशन), कपडे प्रेशर कुकर किंवा स्टरिलायझरमध्ये दाबाखाली वाफारून घेणे (पूर्ण जंतुनाशन),रोग्याची विष्ठा, थुंकी जाळणे, इत्यादी उपाय आपल्याला माहीत असतील. काही वस्तू सोलर कुकरमध्ये निर्जंतुक करता येतील. (उदा. मासिक पाळीच्या घडया, जखमेची बँडेजपट्टी इ.)
डेटॉल, फिनॉल, आयोडिन, चुनकळी, तीव्र आम्ले, इत्यादी रसायने जंतुनाशनासाठी वापरली जातात. ही रसायने अर्थातच शरीराच्या आत वापरता येणार नाहीत. कारण ती जंतूंप्रमाणेच शरीराच्या पेशींनाही मारक असतात. यांपैकी स्पिरिट, आयोडिन व सौम्य डेटॉल ही जखमांच्या स्वच्छतेसाठी वापरली जातात. तसेच ती शस्त्रक्रियेआधी त्वचा निर्जंतुक करण्यासाठी वापरली जातात. निर्जीव वस्तूंसाठी फिनॉल, आम्ले (उदा. सल्फ्युरिक ऍसिड-गंधकाम्ल), चुनकळी, इत्यादी वापरली जातात. क्लोरिन वायू किंवा ब्लिचिंग पावडर पाण्यातले जंतू मारण्यासाठी वापरले जातात.
अनेक अन्नपदार्थ व वैद्यकीय साधने गॅमा किरण वापरून निर्जंतुक केली जातात. पॅकबंद वैद्यकीय साधने (उदा. जखमेसाठी पट्टया, नाळ बांधायचा दोरा, हातमोजे, सलाईनच्या नळया व इंजेक्शनच्या सिरींजेस व सुया, इ.) या पध्दतीने मोठया प्रमाणावर निर्जंतुक केली जातात. अर्थात एकदा वेष्टण फोडून वापरली की त्यांची निर्जंतुकता संपते. प्राथमिक आरोग्यचळवळीसाठी अशी निर्जंतुक साधने पुरवणे शक्य आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/30/2020
सूर्यफूल पिकावर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम ...
टोमॅटो पिकावर अनेकवेळा म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद...
या विभागात सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि त्याचे महत...
पिकास मुख्य अन्नद्रव्य पुरवणाऱ्या रासायनिक खतांची ...