रोगाचा प्रकार
जीवाणूजन्य आजार
पूर्व इतिहास
प्लेग हा प्राचीन काळापासून अस्तित्वाात असणारा रोग असून प्लेणग हा '' यार्सीनिया पेस्टीस '' नावाच्याा जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार कुरतडणा-या प्राण्यां ना जंतूबाधित पिसवांमुळे होतो. भारतामध्ये यापुर्वी शेवटचा प्लेाग उद्रेक हा महाराष्ट्र व गुजरात राज्यांत सन १९९४ साली झालेला आहे. महाराष्ट्रह राज्यामध्ये प्लेग सर्वेक्षण पथकाची स्थारपना सन १९५३ साली झालेली असून या पथकामार्फत प्लेगग्रस्त भागामध्येय नियमितपणे या रोगाचे सर्वेक्षण करण्यालत येते. १९८७ सालापर्यंत एकही प्लेग रुग्णि आढळून आला नसल्याप कारणाने हे पथक दि. ०१ डिसेंबर १९८७ पासून बंद करण्यारत आलेले होते, तथापि ऑगस्टे व सप्टें बर १९९४ साली प्ले ग सदृश्यग रोगाचा उद्रेक बीड जिल्ह्यातील मामला या गावामध्ये झाल्याेने या पथकाची पुनःर्स्थापना ३ ऑक्टोाबर १९९४ साली सहसंचालक, आरोग्यव सेवा (हिवताप व हत्तीीरोग) पुणे यांच्या अधिनस्थब करण्यासत आली असून हे पथक सदयस्थितीमध्येन कार्यरत आहे.
रोग पसरविणारे घटक
'' यार्सीनिया पेस्टीस '' या जीवाणुमूळे हा रोग होतो.हे जीवाणू बाधित व्यक्तिंच्या रक्त, प्लीहा, यकृत व इतर अंतर्गत अवयवामध्ये आढळून येतात. प्लेगचा जीवाणू हा त्यास अनुकूल वातावरणामध्ये कुरतडणा-या प्राण्यांच्या बिळातील मातीमध्ये वाढू शकतो.
जंतुसंसर्गाचे मूळ
मानवामध्ये प्लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्यतः उंदीर व त्यावरील पिसवांमुळे होतो. उंदरामुळे प्रगतशिल देशांतील विशेषतः ग्रामीण भागामध्ये या रोगाचा उद्रेक झालेले आढळतात.
- वय व लिंगः - सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना हा रोग होऊ शकतो.
- व्यवसाय - मानवाच्या दैनंदिन कार्यामध्ये उदाः- शिकार, पशुपालन शेतीची मशागत व बांधकाम अशा व्यवसायादरम्यान या पिसवांच्या सानिध्यात आल्याने या रोगाचा प्रसार होतो.
पर्यावरणातील घटक
- हवामान - उत्तर भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात सुरु होऊन मे महिन्यापर्यंत आढळतो. वातावरणातील तापमानामध्ये वाढ झाल्याने उन्हाळयामध्ये या रोगाचा प्रसार थांबतो.
- पर्जन्यामानः - अति पर्जन्यपमानामुळे कुरतडणा-या प्राण्यां ची आश्रयस्थााने (बिळे ) नष्ट होतात. त्यामुळे पठारी प्रदेशात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही.
प्रसाराचे माध्यम
- मानवी घरे – कच्च्या मातींच्या घरामध्ये या रोगाच्या प्रसारक पिसवा व उंदराना पोषक वातावरण मिळाल्याने या रोगाचा प्रसार जास्त आढळून येतो.
- रोग प्रसार - बाधित पिसवांच्या मार्फत या रोगाचा प्रसार प्राण्यांमध्ये व प्राण्यांपासून मानवास होतो. शरीरावर झालेल्या जखमांमधून या रोगजंतूचा प्रत्यक्ष संसर्ग होतो. या रोगाचा प्रसार बाधित व्यक्तिंच्या, प्राण्यांच्या खोकल्यातून,शिंकण्यातून बाहेर पडणा-या थेंबावाटे देखील होतो.
अधिशयन काळ
- अधिशयन काळ – या रोगाचा संसर्ग झाल्यास रुग्ण २ ते ६ दिवसांमध्ये लसीकाग्रंथिच्या प्रादुर्भावाने (ब्युबॉनिक प्लेग) आजारी पडतो. ब्युबॉनीक प्लेगवर उपचार न झाल्यास प्लेगचे जीवाणू रक्तामध्ये जातात व त्यांची वाढ होते. रक्तामध्ये हे जंतू झपाटयाने वाढून संपूर्ण शरीरामध्ये पसरतात व रुग्ण अत्यवस्थ होतो. यामुळे धोका संभवतो. या जंतूचा प्रसार पुढे फुप्फुसामध्ये होऊन फुप्फुसाच्या प्लेगचा धोका संभवतो.
- संसर्ग झालेल्या व्यक्तिस तीव्र ताप, थंडी, खोकला व श्वास घेण्यास ञास होतो व अशा रुग्णांत रक्तमिश्रित थुंकी पडते. संसर्गबाधित व्यक्तींना वेळीच उपचार न झाल्यास अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो. प्राथमिक श्वसनाच्या प्लेगचा अधिशयन कालावधी १ ते ३ दिवस असून यामध्ये तीव्र श्वसनदाह, तीव्र ताप, खोकला, रक्तमिश्रित थुंकी व थंडी अशी लक्षणे आढळतात. फुप्फुसाच्या प्लेग रुग्णांमध्ये मृत्यू दर जवळपास ५० टक्के आहे.
रोगांची सर्वसाधारण चिन्हे व लक्षणे
- (लसीकाग्रंथीचा ) ब्युबॉनिक प्लेग –लसीका ग्रंथीस सूज येणे, ताप, थंडी व थकवा येणे.
- (रक्ताचा ) रक्तसंसर्ग स्वरुपाचा प्लेग – ताप, थंडी, थकवा येणे, पोटदुखी, त्वचेमध्ये व इतर अवयवांमध्ये रक्तस्ञाव व झटके येणे.
- फुप्फुसाचा (न्युमॉनिक ) प्लेग – ताप, थंडी, खोकला व श्वासोच्छवासास ञास होणे, तीव्र झटका व उपचार न झाल्यास मृत्यू.
औषधोपचार
प्लेग रोग संशयित / बाधित व्यक्ती अथवा प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा पिसवांचा चावा झाल्यास प्रतिजैविकांचा (antibiotics)उपचार घेणे इष्ट ठरते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
- नियमित प्लेग सर्वेक्षणामध्ये उंदीर व त्यावरील पिसवा पकडणे.
- पिसवांची घनता काढणे.
- उंदीर व पिसवा यांचे विच्छेदन व प्रयोगशालेय अन्वेषण
- ग्रामीण भागात कुत्र्यांचे रक्तजलनमूने गोळा करणे.
- ज्या ठिकाणी पिसवांची घनता वाढलेली आढळून येते अशा ठिकाणी मॅलेथीऑन ५ टक्के या किटकनाशकाची धूरफवारणी उंदराच्या बिळामध्ये करण्यात येते.
आरोग्य शिक्षण
- घरात / घराच्या आजूबाजूस उंदीर अथवा इतर प्राण्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेणे.
- आपल्या परिसरात मृत उंदीर आढळल्यास आरोग्य विभागास माहिती देणे.
- पाळीव कुत्र्यांची स्वच्छता व निगा.
स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.