অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंदुज्वर

मेंदुज्वर

प्रस्तावना

मेंदुज्वर हे माणसाच्या मणक्यातील जलाचे व मेंदुला असलेल्या आवरणजलाचे संक्रमण असते. कधीकधी त्याला मणक्याचा मेंदुज्वर देखील म्हणतात.

मेंदुज्वर हा साधारणपणे जिवाणू वा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. हा कशाने झाला आहे हे जाणून घेणे गरजेचे असते कारण दोन्ही मध्ये उपचार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. विषाणूंने झालेला मेंदुज्वर जास्त गंभीर नसतो आणि विशिष्ट उपचारांनी लवकर बरा होतो.

विषाणूंने होणारा मेंदुज्वर

मेंदुज्वराचा संसर्ग करणारे वेगवेगळे विषाणू

  1. विषाणू ("सडणे थांबवणारा") मेंदुज्वर
  2. एंटरोवायरस
  3. कोसॅक्सी वायरस
  4. हरपेस वायरस
  5. गंथ्रींचा कोरीये मेंदुज्वर विषाणू (एलसीएमवी) (एक उंदरामध्ये आढळणारा मेंदुज्वराचा एक प्रकार)

विषाणूंमुळे होणा-या मेंदुज्वराविषयी प्रश्नोत्तरे

विषाणूंमुळे होणारा मेंदुज्वर गंभीर असतो का?

विषाणूंमुळे होणारा ("न सडणारा") मेंदुज्वर हा गंभीर असतो पण रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणा-यांमध्ये त्याची गंभीरता कमी होते. साधारणतः याचा परिणाम ७ ते १० दिवस रहातो आणि रोगी पुर्णपणे बरा होतो. मात्र जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर फार गंभीर स्वरुपाचा असू शकतो. जर योग्य उपचार झाले नाहीत तर रोग्यास व्यंगत्व येऊ शकते किंवा मृत्यूही ओढावतो. ब-याचदा, दोन्ही प्रकारच्या मेंदुज्वरांची लक्षणे सारखीच असतात.

विषाणूंने होणारा मेंदुज्वर का होतो ?

वेगवेगळ्या संक्रमणांमुळे मेंदुज्वर होतो. जवळजवळ ९०% घटनांत मेंदुज्वर हा एंटेरोवायरस वर्गातील विषाणूंमुळे होतो उदा. कॉक्ससॅकीवायरस आणि इकोवायरस. हे जिवाणू उन्हाळ्यात वा थंडीत सामान्यतः जास्त संक्रमक असतात. हरपेसवायरस व मम्सवायरसनेदेखील मेंदुज्वर होऊ शकतो.

हा विषाणू कसे संक्रमण करतो ?

एंटेरोवायरस सामान्यतः मेंदुज्वराचे कारण आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या तोंडातील वा नाकातील द्रव्यांच्या संपर्कात आल्यामुळे (लाळ, थुंकी किंवा शेंबुड), तिच्याशी हात मिळिवल्याने, त्याला स्पर्श केल्याने, त्यानं हाताळलेल्या वस्तू वापरल्याने वा तेच हात तोंडात किंवा नाकात गेल्याने हा जिवाणू संक्रमण करतो. हा जिवाणू लागण झालेल्या व्यक्तिच्या विष्ठेत देखील असतो. त्यामुळे ज्या मुलांना आपली शी अजुन धुता येत नसते अशा मुलांमध्ये हा जिवाणू संक्रमण करतो. बाळाची लंगोट बदलणा-या वा हाताळणा-या व्याक्तिलादेखील याचा संसर्ग होतो. या जिवाणूचे संक्रमण झाल्यावर ३ ते ७ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. संसर्ग झाल्यावर ३ दिवसांपासून तर संसर्ग झाल्याच्या १० दिवसांपर्यंत याचा संसर्ग दुस-याला होऊ शकतो. पण, काही जणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत व फक्त कातडीवर लाल चट्टे पडुन थोडा थंडी-ताप येत राहतो. ह्यातूनही लागण झालेल्या काहीच व्यक्तित ह्याचे रुपांतर मेंदुज्वरात होते.

बचाव

काही जणांमध्ये एंटरोवायरसची लक्षणे दिसत नाहीत म्हणून त्यापासून बचाव करणे अवघड आहे. पण स्वच्छ राहिल्याने तुम्ही यापासून बरेच वाचू शकता. जर तुमचा ज्याला लागण झाली आहे अशा व्याक्तिशी संपर्क आला तर, त्वरित हात धुवुन टाका आणि स्पर्श झालेला भाग स्वच्छ करा, त्या व्यक्तिने हाताळलेल्या वस्तू पाणी व साबणाने स्वच्छ करा आणि त्याला क्लोरिनच्या पाण्याने धुवा (१/४ कप ब्लिच एक गॅलन पाण्यात मिसळलेले) जो ह्या जिवाणू पासून वाचण्यासाठी फार चांगला उपाय आहे, खासकरुन मुलांच्या पाळणाघरात वगैरे.

जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर

जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर हा गंभीर स्वरुपाचा संसर्ग आहे जो मणक्याच्या किंवा मेंदुच्या आवरणातल्या जलात होतो.

जिवाणुंचे प्रकार

  1. नैसेरिया मेनिंजायटीस जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर लहान मुलांमध्ये व युवा पिढीमध्ये दिसुन येतो.
  2. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी
  3. बी ग्रुपचा स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस) रोग
  4. हेमोफिलस इन्फ्लूएंझा सिरोटाईप बी (हिब) रोग.

जिवाणूंमुळे होणा-या मेंदुज्वराविषयी प्रश्नोत्तरे

जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर गंभीर आहे का आणि तो कशाने होतो ?

जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर हा फार गंभीर आहे. ह्याच्या संसर्गामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. १९९० च्या आधीच्या काळात, हिब या जिवाणूंमुळेच मेंदुज्वर होत असे पण मुलांमध्ये लहानपणापासूनच्या लसीकरणामुळे ह्याचे प्रमाण फार कमी झालेले आहे. आज, निसेरिया मेंदुज्वर आणि स्ट्रेप्टोकोकास् न्यूमोनिया या जिवाणूंमुळेच मेंदुज्वर होतो. निसेरिया मेंदुज्वर हा  मेनिंनकोकल मेनिंजायटीसमुळे होतो व स्ट्रेप्टोकोकास् न्यूमोनियामुळे न्यूमोकोकल मेंदुज्वर होतो.

कोणत्या जिवाणूंमुळे कोणता मेंदुज्वर झाला आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते कारण उपचारांनी त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
हा जिवाणू व्यक्तिच्या तोंडात वा घशात राहतो. काहीवेळा क्वचित तो शरिराच्या इतर भागांतील द्रव्यांतही दिसून येतो व तिथुन तो मेंदुच्या आणि मणक्याच्या आवरणापर्यंत पोहोचतो. तेथे ते झपाट्याने वाढू लागतात. लवकरच, मेंदुच्या आवरणावर व मणक्याच्या आवरणावर (मेनीन) सुज येते व ते दुखु लागते व त्यातूनच मेंदुज्वराची लक्षणे दिसू लागतात.

हा जिवाणू संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या तोंडावाटे वा नाकावाटे याणा-या स्त्रावातून पसरतो. सुदैवाने, असे जिवाणू संसर्गजन्य नसतात आणि ते सहजासहजी पसरत नाहीत.

याची लक्षणे काय आहेत?

वय वर्ष २ च्या पुढील व्यक्तिंमध्ये, सामान्यतः खुप ताप, डोके दुखणे, मानेत लचका येणे अशी लक्षणे दिसू लागतात . संसर्ग झाल्यावर २ ते ३ तासातच किंवा १ ते २ दिवसात लक्षणे दिसू लागतात. इतर लक्षणांमध्ये मळमळ, उलटया, प्रखर उजेड नकोसा होणे, घुटमळ आणि सुस्ती येणे आदींचा समावेश होतो. ज्वराचा जोर जास्त झाल्यावर त्वचेखाली जखमा होऊ लागतात. जन्मजात बालकांत लगेच रोग पसरतो, सामान्यपणे ताप, डोकेदुखी व मानदुखी ही लक्षणे पहायला मिळतात त्यामुळे लागण झाली आहे हे ओळखणे कठीण असते. बाळांमध्ये दिसून येणार्या इतर लक्षणांमध्ये मुलांतील उत्साह कमी होणे, चिडचिड वाढणे, उलट्या आणि कमी अन्न घेणे हे दिसून येते. जसा जसा रोग वाढतो तसे रुग्णाला फिट येऊ लागतात.

धोका कोणाला असतो ?

जिवाणूंमुळे होणारा मेंदुज्वर कोणालाही होऊ शकतो पण सामान्यतः हा लहान बाळांमध्ये व मुलांमध्ये पहायला मिळतो. निसेरिया मॅनिंजायटिस किंवा हिबमुळे लागण झालेल्या व्यक्तिच्या अतिजवळ राहणा-याला, त्या व्यक्तिच्या शाळेतील मुलांना किंवा घरातील लोकांनादेखील धोका असतो. जो लागण झालेल्या व्यक्तिच्या नाकातोंडातील द्रव्याच्या सरळ संपर्कात आहे अशा व्यक्तिलादेखील धोका असतो. रोग जास्त वाढल्यास मेंदु पुर्णपणे निकामी होऊ शकतो, रुग्ण कोमात जाऊ शकतो आणि मृत्यूमुखी पडु शकतो. शिवाय रुग्णाला बरे झाल्यावरही फार काळ त्रास होत राहतो, जसे कि ऐकु येणे बंद होणे, मंदबुद्धी, अर्धांगवायू आणि मिरगीचे झटके इत्यादी.

बचाव

लस – हिबवर, निसेरिया मॅनिंजायटिडीसच्या काही प्रकारांवर आणि स्ट्रेप्टोकोकस् न्यूमोनियाच्या ब-याच लसी उपलब्ध आहे.
हिबवरील लस ही फार उपयूक्त व प्रभावकारी आहे. वयाच्या ६व्या वर्षी, प्रत्येक बाळाला हिबच्या ३ लसी दिल्या गेल्या पाहिजेत. ४था डोस (बुस्टर) मुलांना वयाच्या १२ ते १८ महिन्यात द्यावा.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate