संधिवाताभ संधिशोथाचं नेमकं कारण अद्याप ज्ञात नाही. अनुवांशिक, पर्यावरणात्मक आणि संप्रेरक घटकांच्या दरम्यान होणारी ही एक आंतरक्रिया असल्याचं समजलं जातं (म्हणजेच, शरीराची प्रतिकार शक्ती ऊतींना स्वतःच्या समजण्यात अक्षम ठरते आणि त्यांना परकीय वस्तु समजून त्यांच्यावरच हल्ला करते) त्यामुळं दाह होतो आणि परिणामी संधींचा नाश होतो आणि विकृती निर्माण होते.
अनुवांशिक घटक या रोगाची शक्यता वाढवतात. संधिवाताभ संधिशोथ हा कुटुंबांमधे परंपरेनं होतो.
पर्यावरणात्मक घटक हे या रोगाची गती वाढवतात किंवा मंद करतात असं समजलं जातं. संक्रमणात्मक अनेक घटकांचा शोध लागलेला आहे.
संप्रेरक घटक हे या रोगाची गती वाढवतात किंवा मंद करतात असं समजलं जातं. स्त्रियांमधे रजोनिवृत्तीच्या आसपास (रजोनिवृत्तीच्या वयानुसार) हा रोग होण्याची शक्यता अधिक असते.
वयः हा रोग कोणत्याही वयात होऊ शकत असला तरी, त्याचा आढळ हा वयाच्या 20-40 वर्षांच्या आसपास अधिक प्रमाणात असतो.
लिंगः स्त्रियांमधे रजोनिवृत्तीच्या आसपास हा रोग होण्याची शक्यता तीनपट अधिक असते.
पहिला बदल म्हणजे संधींच्या आतल्या स्तराला सूज येते आणि पांढ-या रक्तपेशी जमा होतात. सायनोव्हीयल मेम्ब्रेनचा (पडदा) दाह हा संधीच्या जागेत सायनोव्हीयल द्रवाचा स्त्राव होऊन तो जमा होतो. नंतरच्या टप्प्यात, सायनोव्हीयल पडदा जाड होतो आणि संयुक्त पोकळीत लांब बोटांच्या आकारात बाहेर येतो. हा घट्ट, सूजलेला, दाटीवाटीचा सायनोव्हीयल पडदा पसरतो आणि ऑरीक्युलर कूर्चेच्या खाली जातो (पॅनस फॉर्मेशन). या पॅनसमुळं कालांतरानं ऑरीक्यूलर कूर्चेची आणि त्याखालील हाडाची झीज होते आणि, परिणामी संधींमधील जागा कमी होते आणि संधी मोकळेपणानं फिरण्याची शक्यता कमी होते.
हो रोग वाढत जातो तसं, स्नायू आणि संधी विचित्र अवस्थेत अडकून बसतात, असं हमखास होतं कारण, रुग्ण हा जास्तीतजास्त आराम पडावा या उद्देशानं आपला पाय वाकवून ठेवतो. त्यानंतर, पॅनस हे संधींच्या आडवे जाऊन मिळते आणि त्याचे धागे गुंतले जातात (कडक ऊती बनते). त्यामुळं संधी जुळल्या जाण्याची स्थिती बनते, ज्याला अँकीलोसिस म्हणतात.
या बदलांसोबतच, त्वचेखाली आणि फुफ्फुसं, ङृदय आणि डोळे यांसारख्या अन्य ठिकाणांच्या खाली संधिवाताभच्या गाठी तयार होतात.
या व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेतः
शारीरिक उपचार, वैद्कीय उपचार आणि आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया यांचा समावेश असलेली संयुक्त पध्दती निवडून ही उद्दीष्टे साध्य करता येतात.
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 1/29/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...