हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत. पण सर्व प्रकारांत समान घटक म्हणजे हाडावर अचानक होणारी वाढ. हा वाढलेला भाग सहसा दुखत नाही. हाताने दाबून पाहिल्यावर हा भाग हाडासारखाच कठीण लागतो. हाडांचा कर्करोग बहुतेक शाळकरी वयात येतो. हा आजार घातक असतो. योग्य वेळी निदान झाल्यास काही प्रकारांत औषधोपचाराचा उपयोग होतो. पण आजार मूळ जागेपासून इतरत्र पसरला असेल तर उपचारांचा फायदा होत नाही. हाडावर अचानक (काही दिवसात) येणारी टणक सूज किंवा गाठ ही या दृष्टीने धोक्याची खूण समजावी. अशावेळी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 3/28/2020
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे....
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
नैसर्गिकपणे येणार्या तंतुमय गारगोटी खनिजला अस्बेस्...
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...